Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांनी पुण्याजवळील रांजणगाव प्रकल्पात जागतिक मार्केटसाठी वाहने विकसित करण्याचा निश्चित करार केला आहे. टाटाच्या वाहन आर्किटेक्चरचा वापर करून स्टेलँटिसची भारतीय इंजिनिअरिंग टीम नवीन मॉडेल्सवर काम करणार आहे. या सहकार्यामुळे भारतातील वाहन प्रोडक्शन आणि निर्यातीला नवी दिशा मिळू शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 12, 2026 | 07:37 PM
टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी भारतात नवीन वाहने विकसित करणार आहेत.
  • पुण्याजवळील रांजणगाव प्रकल्पात टाटा आणि जीपच्या वाहनांसह नवीन जागतिक मॉडेल्सचे प्रोडक्शन होण्याची योजना आहे.
  • टाटाचे वाहन आर्किटेक्चर आणि स्टेलँटिसचे इंजिनिअरिंग नेटवर्क एकत्र येऊन निर्यातीच्या संधी वाढवू शकतात.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांनी भारतात नवीन वाहने विकसित करण्यासाठी निश्चित करार केला आहे. या करारानुसार, 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी नवीन वाहने तयार करण्याची योजना आखलेली आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) या टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाचाही या सहकार्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या वाहनांचे प्रोडक्शन पुण्याजवळील रांजणगाव इथल्या संयुक्त प्रकल्पात केले जाणार आहे.

रांजणगाव प्लांटची भूमिका महत्त्वाची

रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड (FIAPL) हा टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांचा 50:50 संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पात सध्या टाटा नेक्सॉन, अल्ट्रॉझ आणि कर्व्ह यांसारख्या गाड्यांसह जीपची काही मॉडेल्स तयार केली जातात. जीप कंपास आणि मेरिडियनचे प्रोडक्शन इथे होते, तर ग्रँड चेरोकी आणि रँग्लरची CKD पद्धतीने असेंब्ली केली जाते. या कारखान्यात इंजिन, ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनशी संबंधित प्रोडक्शन सुविधाही आहेत.

भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी

टाटाची टेक्नोलॉजी, स्टेलँटिसचे ग्लोबल नेटवर्क

या करारानुसार, टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या आर्किटेक्चर आणि प्रोडक्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्याची संधी स्टेलँटिसला देणार आहे. स्टेलँटिस भारतातील आपल्या इंजिनिअरिंग टीमच्या मदतीने नवीन वाहनांचा विकास करेल. त्यानंतर वेगवेगळ्या देशांतील नियम, रस्त्यांची परिस्थिती आणि लोकल कस्टमरच्या गरजांनुसार वाहनांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. त्यामुळे भारतातील वाहन विकास कौशल्याचा उपयोग ग्लोबल मार्केटसाठीही होऊ शकतो.

रांजणगाव प्लांटमधून याआधीच जपान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये वाहनांचा एक्स्पोर्ट केली जाते. नवीन करारामुळे या प्रोजेक्टमधून स्टेलँटिसच्या ग्लोबल मार्केटसाठी विकसित केलेल्या वाहनांचे प्रोडक्शन आणि निर्यात वाढवण्याची संधी निर्माण होऊ शकते. भारतातील ऑटो पार्ट्स पुरवठादार आणि सध्याच्या प्रोडक्शन मशिनरीचाही या उपक्रमाला फायदा होण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! संपूर्ण EV लाइनअपवर Battery-as-a-Service योजना, 4.69 लाखांपासून मिळणार कार

2 दशकांहून जुन्या सहकार्याला नवी दिशा

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांच्यातील इंडस्ट्रीयल पार्टनरशिप 2 दशकांहून जुनी आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही कंपन्यांनी सहकार्याबाबत सामंजस्य करार केला होता. आता निश्चित करारामुळे वेईकल आर्किटेक्चर आणि टेक्नोलॉजीच्या सहकार्याला ठोस स्वरूप मिळाले आहे.

स्टेलँटिस समूहात जीप, सिट्रॉएन, फियाट, प्यूजो, ओपेल, मासेराती आणि अल्फा रोमियो यांसारखे ब्रँड्स आहेत. या भागीदारीमुळे भारतातील इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन सुविधांचा वापर करून आंतरराष्ट्रीय गरजांनुसार वाहने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन मॉडेल्सची नावे, लाँचची वेळ आणि एक्स्पोर्टचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Web Title: Tata motors stellantis india vehicle development global markets partnership ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • automobile
  • Global Market
  • tata motors

संबंधित बातम्या

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
1

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
2

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
3

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या
4

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.