Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी मोठी बातमी, संकट काळात LPG पुरवठा अर्जेंटिनामधून होणार; कंत्राट अदानी पोर्ट्सला

देशात एलपीजीच्या वाढत्या किमती आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे सध्या परिस्थिती फारच बिकट आहे. भारतासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे.गौतम अदानी यांच्या कंपनी, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनला, अर्जेंटिनाच्या LNG निर्यात प्रकल्पासाठी १० वर्षांचे कंत्राट मिळालं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 08, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Adani Ports : देशात एलपीजीच्या वाढत्या किमती आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे सध्या परिस्थिती फारच बिकट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनी, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनला, अर्जेंटिनाच्या LNG निर्यात प्रकल्पासाठी १० वर्षांचे सागरी सेवा कंत्राट मिळाले आहे. यासह, कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय सागरी कार्याचा दक्षिण अमेरिकेत प्रथमच विस्तार केला आहे. नेमका कसा असेल विस्तार? काय असेल प्लॅनिंग? सविस्तर जाणून घेऊयात

दर सर्वात स्वस्त? भारतात 942 रुपयांचा LPG सिलेंडर; पाहा पाकिस्तान, श्रीलंकेत थक्क करणाऱ्या किंमती

कंपनी काय करणार नेमकं काम?

अर्जेंटिनाच्या मेरिडियन ग्रुपच्या कन्सोर्टियमसोबतच्या जागतिक निविदा प्रक्रियेतुन, APSEZ ची उपकंपनी असलेल्या अदानी हार्बर इंटरनॅशनल FZCO ला हे कंत्राट देण्यात आलं आहे. प्रकल्प विकासक, सदर्न एनर्जी एस.ए. (SESA) ने सादर केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निविदेनंतर हे कंत्राट देण्यात आलं आहे. या करारानुसार, अदानी-मेरिडियन कन्सोर्टियम प्रकल्प स्थळावरून कार्यरत असलेल्या LNG वाहकांसाठी संपूर्ण सागरी सेवा प्रदान करणार आहे. यामध्ये टगबोट संचालन, ऑफशोअर लॉजिस्टिक्स आणि पुरवठा सहाय्य, आणि कर्मचारी हस्तांतरण सेवा यांचा समावेश आहे. या कामासाठी चार उच्च-दर्जाच्या टगबोट्स, एक अँकर हँडलिंग टग सप्लाय व्हेसल आणि एक क्रू बोट वापरली जाईल.

सादर केलेल्या माहितीनुसार, या कंत्राटाशी संबंधित गुंतवणूक अंदाजे ७० दशलक्ष डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, अर्जेंटिनाच्या किनारपट्टीवर मोठ्या गॅस-वाहक जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी अदानी पोर्ट्सची असेल. या उद्देशासाठी कंपनी चार विशेष टगबोट्स आणि क्रू बोटी तैनात करेल. या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

करार का आहे महत्त्वाचा?

इस्रायल आणि श्रीलंका नंतर, अदानी समूहाने प्रथमच दक्षिण अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी ऑपरेटर कंपनी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या करारानुसार, अदानी पोर्ट्सला वार्षिक ७ दशलक्ष डॉलर्सचे निश्चित उत्पन्न मिळेल. ही बातमी भारतासाठी महत्त्वाची आहे, कारण यामुळे भविष्यात अर्जेंटिनामधून गॅस निर्यातीला चालना मिळू शकते. यामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या गॅस आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल.

आधी होर्मुझ…आता बाबा-अल-मंदेब, Iran च्या धमक्यांनी टेंशनमध्ये जग; कच्च्या तेलाने उडवली सगळ्यांची झोप

Web Title: India to import lng from argentina adani ports gets contract marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Adani
  • Adani Case
  • Adani News
  • Gautam Adani

संबंधित बातम्या

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी
1

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी

Adani Case: अमेरिकन कोर्टात मोठा ट्विस्ट! 600 पानांच्या दलीलांमुळे बाजी पलटली? अदानी समूहाला क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा?
2

Adani Case: अमेरिकन कोर्टात मोठा ट्विस्ट! 600 पानांच्या दलीलांमुळे बाजी पलटली? अदानी समूहाला क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.