Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराबाबत मोठी अपडेट आली आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारत-अमेरिका कराराबाबत हालचालींना वेग आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारत-अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी सुरू झाल्यानंतर, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेम्सन ग्रीअर या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. नेमकं यांच्यातील करारामध्ये काय आहे? काय आलीय ही अपडेट सविस्तर जाणून घेऊयात.

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद

दोन्ही देश अमेरिका-भारत द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत एका अंतरिम व्यापार करारावर आणि संयुक्त निवेदनावर वाटाघाटी करतील. भारत – अमेरिका यांच्यातील कराराला पुढे नेतील. ही माहिती अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने २१ जून रोजी दिली. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

मोदी- ट्रम्प यांच्या भेटीनंतर कराराबाबत अपडेट

G- 7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारत-अमेरिका कराराबाबत हे अपडेट आले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर करारावरील वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी जेम्सन ग्रीर यांचा भारत दौरा आहे. या बैठकीत करारावर सविस्तर चर्चा आणि भविष्यातील धोरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ही बैठक महत्त्वाची का?

भारत आणि अमेरिका हे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. अलिकडच्या वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार १९० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. दोन्ही सरकारांनी येत्या काही वर्षांत व्यापार आणखी वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे, जेम्सन-ग्रीर बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण त्यातून व्यापार वाटाघाटींची दिशा स्पष्ट होऊ शकते.

या करारावर आतापर्यंत काय घडलं?

भारत आणि अमेरिका यांच्यात एका अंतरिम व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे, परंतु दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारावरील वाटाघाटी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. दोन्ही बाजू या करारावर सातत्याने वाटाघाटी करत आहेत आणि अंतिम करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. भारत अमेरिकेकडून शुल्कात आणखी कपात करण्याची मागणी करू शकतो, तर अमेरिका भारताने काही विशिष्ट कृषी उत्पादनांना परवानगी द्यावी अशी मागणी करत आहे.

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Web Title: India us interim trade deal final touches piyush goyal marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Business News
  • Donald Trump
  • India-US trade deal
  • Marathi News
  • narendra modi

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.