Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून शेतकऱ्यांचा संताप; अमेरिकन कृषी उत्पादने येणार भारतात?

भारत-US व्यापार करारावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 05:22 PM
India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून शेतकऱ्यांचा संताप; अमेरिकन कृषी उत्पादने येणार भारतात?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून शेतकऱ्यांचा संताप; अमेरिकन कृषी उत्पादने येणार भारतात?

Follow Us
Follow Us:
  • भारत-अमेरिका करारावर संसदेत रणसंग्राम 
  • भारतातील शेतकरी संघटना आक्रमक
  • शून्य आयात शुल्काचा शेतकऱ्यांना धोका?
 

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, जर अमेरिकन कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क शून्यावर आणले तर भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. तसेच, शेतकऱ्यांनी या करारामुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादन वाढतील आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत शेतीवर होईल असा दावा केला आहे. तथापि, सरकारचे असे म्हणणे आहे की, या कराराची संपूर्ण माहिती अद्याप उघड झालेली नाही. तसेच, शेती आणि दुग्धव्यवसाय यासारख्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण देण्यात आले आहे.

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले असून त्यात हा करार शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचे विधान केले आहे. तसेच, अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते, ज्यामुळे त्यांची उत्पादने स्वस्त होतात. जर अशी उत्पादने भारतात आली तर मध्यमवर्गीय शेतकरी जगू शकणार नाहीत. किसान मोर्चाने आरोप केला आहे की सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली हे पाऊल उचलले आहे. तर, दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांची भीती निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने त्यांच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रांचे पूर्णपणे संरक्षण केले आहे. कराराच्या प्रत्येक पैलू लक्षात घेऊन वाटाघाटी केल्या गेल्या आहेत आणि क्षेत्राशी तडजोड केली गेली नाही. भारत आणि अमेरिका लवकरच या कराराचे तपशीलवार संयुक्त निवेदन जारी करतील. गोयल यांच्या मते, या करारामुळे भारतातील कापड, चामडे, रत्ने आणि दागिने, पादत्राणे आणि उत्पादन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील. असेही त्यांनी सांगितले.

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता

दरम्यान, अमेरिकेच्या भारत अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क शून्यावर आणेल आणि अमेरिकेकडून ५०० अब्ज किमतीच्या वस्तू देखील खरेदी करेल या विधानांमुळे वाद आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक रोलिन्स यांनी या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि भारत त्यांच्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ बनेल. असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी भारत अनेक अमेरिकन कृषी आणि औद्योगिक उत्पादनांवरील शुल्क कमी करण्यास तयार आहे, तरी काही प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचे नियंत्रण राहील. असे त्यांनी सूचक विधान केले.

या दरम्यान संसदेत भारत-अमेरिका व्यापार करारामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली शेतकऱ्यांचे श्रम विकल्याचा आरोप केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: India us trade deal farmers row intensifies opposition attacks modi govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • America
  • india
  • India-US trade deal
  • International Trade

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
4

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.