Mahindra Harvest Yuva 50HP Compact Harvester Launch (फोटो सौजन्य-AI एआय)
शेतीमध्ये मजुरांची कमतरता आणि कापणीसाठी लागणारा वाढता खर्च लक्षात घेता महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Harvest Yuva नावाचा नवीन 50HP Compact Harvester लाँच केला आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या Self Propelled Harvester मुळे कमी जागेत आणि अरुंद रस्त्यांवरून शेतीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. कंपनीने हे मशीन किफायतशीर दरात सादर करण्यावर भर दिला आहे.
महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर
छोट्या शेतांसाठी खास रचना
महिंद्रा Harvest Yuva मध्ये 50HP इंजिन आणि 4WD म्हणजेच फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे ओलसर तसेच कोरड्या जमिनीवर हे मशीन वापरता येते. भात, गहू, सोयाबीन आणि मका यांसारख्या वेगवेगळ्या पिकांची कापणी करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. विशेषतः चिखल असलेल्या भातशेतीमध्ये 4WD सिस्टीममुळे चांगले ट्रॅक्शन मिळण्यास मदत होते.
या हार्वेस्टरमध्ये 9.3 फूट आणि 10.9 फूट अशा 2 प्रकारच्या कटर बारचे ऑप्शन देण्यात आले आहेत. त्याची ट्रॅक रुंदी 8 फूट असून, बंद स्वरूपातील अनलोडिंग ट्यूबमुळे अरुंद ग्रामीण रस्त्यांवरून वाहतूक करणे सोपे होते. कटर बार मशीनला जोडलेलाच ठेवून शेतापर्यंत जाता येते. त्यामुळे प्रत्येक वेळी तो वेगळा काढण्याची आणि पुन्हा जोडण्याची गरज पडत नाही.
महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका
ऑपरेटरच्या सोयीसाठी खास फीचर्स
Harvest Yuva मध्ये कमी उंचीवर ऑपरेटर स्टेशन, सहप्रवाशासाठी स्वतंत्र सीट आणि सेल्फ क्लीनिंग रेडिएटर देण्यात आला आहे. इंजिन मागच्या बाजूला बसवण्यात आल्यामुळे ऑपरेटरला जाणवणारा उष्णतेचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यामध्ये हायड्रॉलिक रील अॅडजस्टर, प्रॉन्ग कटर आणि फीडर रिव्हर्सर यांसारखी फीचर्स आहेत. पिकांची उंची आणि घनतेनुसार कापणीमध्ये बदल करता येतो. मशीनमध्ये पिकांचे अवशेष अडकल्यास ऑपरेटर स्टेशनवरून लीव्हरच्या मदतीने ते बाहेर काढता येतात. हलक्या वजनाची चेन-ड्रिव्हन यंत्रणा जमिनीवरील दाब कमी ठेवण्यास मदत करते.
किंमत आणि विक्री कुठे सुरू?
महिंद्राच्या दाव्यानुसार, Harvest Yuva ची किंमत काही मोठ्या सेल्फ-प्रोपेल्ड हार्वेस्टरच्या तुलनेत 25% पर्यंत कमी आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची 7 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. या मशीनवर कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी दिली जाणार आहे.
सध्या महिंद्रा Harvest Yuva महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यांमध्ये अव्हेलेबल आहे. लहान शेतकरी तसेच हार्वेस्टर भाड्याने देणाऱ्या ग्रामीण उद्योजकांसाठी हे मशीन उत्पन्नाचे साधन ठरू शकते.






