Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे वाह… America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज; ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant, डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले…

Indian Company US Steel Plant : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी ऐतिहासिक घोषणा करत एका भारतीय कंपनीद्वारे अमेरिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा Steel Plant उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या महाकाय प्रकल्पाद्वारे अमेरिकेत अब्जावधी डॉलरची गुंतवणूक आणि हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 07:15 PM
America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज ( सौजन्य - Chatgpt )

America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज
  • ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant
  • डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
Indian Company US Steel Plant : भारत वेळोवेळी आपला ठसा जागतिक स्तरावर उमटवण्यात मागे पडत नाही. भारताने हे जगाला दाखवूनही दिलं आहे. भारतीय कंपन्या आता जागतिक स्तरावर आपली ताकद अधिकाधिक दाखवत आहेत. त्याचं मुर्तिमंत उदाहरण नुकतंच व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिसून आलं. सोमवारी ओव्हल ऑफिसमधून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. या घोषणेतून महासत्ताक असलेल्या अमेरिकेच्या व्यासपीठावर भारताला एक मोठी संधी मिळाली. भारतीय कंपनी आता सर्वात मोठा स्टील प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे. कोणती कंपनी आहे जी एवढी मोठी जबाबदारी पार पाडणार आहे. यासगळ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ( Indian Company US Steel Plant ) 

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून एका ऐतिहासिक घोषणेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, भारताचा एस्सार ग्रुप, आपली अमेरिकेतील उपकंपनी मेसाबी मेटॅलिक्सच्या माध्यमातून, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पोलाद कारखाना उभारणार आहे. ट्रम्प यांनी या गुंतवणुकीचे वर्णन अमेरिकन उत्पादन क्षेत्राला चालना देणारे असे केले. नेमकं काय घडलं सगळं सविस्तर जाणून घ्या.

हाई-क्वॉलिटी स्टीलचं उत्पादन

ट्रम्प यांनी घोषणा केली की, भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी एस्सार ग्रुप आपल्या अमेरिकेतील युनिटमार्फत अमेरिकेतील सर्वात मोठा पोलाद कारखाना उभारण्यासाठी एकूण १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी सांगितले की, या कारखान्यात दरवर्षी अंदाजे १० दशलक्ष टन पोलादाचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे लोह मिनेसोटामधील खाणींमधून काढलं जाणार आहे. आयोवामधील एका नवीन पोलाद संकुलात त्यावर प्रक्रिया करून उच्च-गुणवत्तेचे पोलाद तयार केले जाईल. याचा अर्थ असा की, कच्चा माल अमेरिकन असेल आणि कारखाना तिथेच उभारला जात आहे, ज्यामुळे कोणत्याही शुल्काशिवाय एक सुरक्षित पुरवठा साखळी सुनिश्चित होईल.

#WATCH | Washington DC | Mesabi Metallics chairman Rewant Ruia says, “Thank you, US President Donald Trump, for bringing back the importance of building things in America… With the new steel complex in Iowa, we will complete the fully integrated American supply chain, from mine… https://t.co/cJJWyT51qQ pic.twitter.com/uY7wDphhhj — ANI (@ANI) September 28, 2026

शेकडो मैलांचे अंतर असूनही योजना

पण या प्रकल्पासंदर्भात एक प्रश्न असा आहे की, दोन्ही राज्यांमध्ये शेकडो मैलांचे अंतर असूनही, मेसाबी मेटॅलिक्स मिनेसोटामध्ये उत्खनन केलेल्या लोहखनिजाचा वापर करून आयोवामध्ये पोलाद तयार करण्याची योजना का आखत आहे. मिनेसोटाची खाण आयोवाच्या उत्तर सीमेपासून अंदाजे २५० मैल दूर आहे. विजेचा खर्च हे एक कारण असू शकते. पोलाद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते आणि आयोवामधील व्यावसायिक विजेचे दर मिनेसोटापेक्षा थोडे कमी आहेत. कदाचित यामुळेच कंपनी आयोवामध्ये कारखाना उभारण्याचा विचार करत असावी.

हा प्रकल्प कधी सुरु होईल?

या प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू असून, २०३० पर्यंत ते व्यावसायिक उत्पादनासाठी सज्ज करण्याचे लक्ष्य आहे. यशस्वी संचालनाच्या पहिल्या १० वर्षांत, हा प्रकल्प अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत एकूण ९५ अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे ८ लाख कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देईल. सुरुवातीला, त्याची वार्षिक क्षमता ७.५ दशलक्ष टन असेल, जी पुढील काही वर्षांत आधुनिक डिजिटल आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वार्षिक १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

October Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार? कामाचं नियोजन करण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांचे कॅलेंडर

Web Title: Indian company to build biggest steel plant in us trump announcement marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • America
  • Largest Steel Plant

संबंधित बातम्या

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?
1

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?

LPG पुरवठ्यात America ने मारली बाजी! भारताला सर्वाधिक पुरवठा करणारा ठरला देश; अमेरिकन अधिकाऱ्यांचे मोठं विधान
2

LPG पुरवठ्यात America ने मारली बाजी! भारताला सर्वाधिक पुरवठा करणारा ठरला देश; अमेरिकन अधिकाऱ्यांचे मोठं विधान

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
3

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.