Novitas Solar Investment Maharashtra ( सौजन्य - सोशल मीडिया )
4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
ही गुंतवणूक नव्हिटास सोलरच्या साध्या सोलर मॉड्यूल उत्पादकाकडून एकात्मिक स्वच्छ ऊर्जा कंपनी बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. कंपनीचा नवीकरणीय ऊर्जा मूल्य साखळीच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम क्षेत्रांमध्ये उपस्थिती अधिक दृढ करण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी कंपनीने देशांतर्गत उत्पादन क्षमतांची निर्मिती, पुरवठा साखळीचे सक्षमीकरण आणि मोठ्या प्रमाणावरील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात सहभाग यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कंपनी केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता आता नवीकरणीय ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही विस्तार करत आहे. महाराष्ट्रात, नव्हिटास सोलर ईपीसी आणि इंडीपेन्डंट पॉवर प्रॉड्युसर (आयपीपी) मॉडेल्स अंतर्गत अनुक्रमे २०० मेगावॅट आणि २५ मेगावॅट क्षमतेचे दोन सोलर पार्क्स विकसित करत आहे. तसेच, गुजरातमध्ये कंपनी वडोदरा येथे ५ जीडब्ल्यूएच बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पासह ऊर्जा साठवणूक क्षेत्रात पदार्पण करत आहे, ज्यामुळे स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेतील कंपनीची क्षमता अधिक दृढ होईल.
नव्हिटास सोलरचे डायरेक्टर अंकित सिंघानिया म्हणाले, “भारताचा नवीकरणीय ऊर्जेचा प्रवास अद्वितीय टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे कामाचा आवाका, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या क्षेत्राची स्पर्धात्मकता ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतील. नव्हिटास सोलरमध्ये, आम्हाला संपूर्ण मूल्य साखळीत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि क्षमतांची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे आम्ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनामध्ये मोलाचे योगदान देण्यास सक्षम होऊ. पुढील पाच वर्षांतील आमच्या १०,००० कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणूकीमधून ही महत्त्वाकांक्षा दिसून येते. आम्ही उत्पादन क्षमतेसह भारतातील नवीकरणीय ऊर्जा परिसंस्थेच्या पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक करत आहोत.”
ही नियोजित गुंतवणूक नव्हिटास सोलरच्या सध्याच्या उत्पादन पायावर उभारली जात आहे. कंपनीची वार्षिक ३ गिगावॅट सोलर मॉड्यूल निर्मिती क्षमता आहे. तसेच कंपनी टॉपकॉन आणि बायफेशिअल मोनो पीईआरसी तंत्रज्ञानासह उच्च-कार्यक्षम सोलर मॉड्यूल्सची निर्मिती करते. कंपनीने आपला सोलर एनकॅप्सुलंट व्यवसाय नव्हिटास अल्फाच्या माध्यमातून बॅकवर्ड इंटिग्रेशन साधले आहे, तर नव्हिटास प्लॅनेट सारख्या उपकंपन्यांच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.
भारतातील युटिलिटी-स्केल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसोबत कंपनीचा ईपीसी व्यवसाय युटिलिटी/आयपीपी स्तरावरील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दक्षिण आफ्रिका प्रदेशात देखील उपस्थिती विस्तारत आहे.
करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख






