Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम! आज सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार तेजीची शक्यता

Share Market Update: बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज वाढीसह उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण अमेरिका-इराण शस्त्रसंधीमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2026 | 08:50 AM
Stock Market Today: अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम! आज सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार तेजीची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम! आज सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार तेजीची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीत जवळपास 689 पॉइंट्सची वाढ दिसत आहे.
  • तज्ज्ञांनी आज काही निवडक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • जागतिक तणाव कमी झाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
India Share Market Update: अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. आज ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ६८९ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,८४० च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोनं स्वस्त झालं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन भाव

मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात तेजी कायम ठेवली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५० ९.७३ अंकांनी, म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढून ७४,६१६.५८ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० १५५.४० अंकांनी, म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी वाढून २३,१२३.६५ अंकांवर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १०७.१५ अंकांनी, म्हणजेच ०.२० टक्क्यांनी वाढून ५२,७१६.२५ वर बंद झाला. अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधी करारावर सहमत झाले असून , तेहरानने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या बदल्यात लष्करी हल्ले थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमेरिका-इराण युद्धबंदी कराराच्या पार्श्वभूमीवर, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी बुधवार, ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. बगाडिया यांनी सुचवल्यानुसार, आज गुंतवणूकदार गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड, डेटा पॅटर्न्स (इंडिया), वेल्सपन कॉर्प, सारडा एनर्जी अँड मिनरल्स आणि डीईई डेव्हलपमेंट इंजिनियर्स या शेअर्सची शिफारस करू शकतात.

US Iran War : युद्धामुळे मालवाहू जहाजांचा विमा 10 पटीने महागला, तुमच्या खिशावर पडणार महागाईचा बोजा

निओट्रेडरचे सहसंस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना नॅटको फार्मा लिमिटेड, गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड, केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि थंगामयिल ज्वेलरी लिमिटेड हे पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी गुंतवणूकदारांना आयटीसी फ्युचर्स, इटरनल फ्युचर्स आणि इंडियन हॉटेल्स कंपनी फ्युचर्स या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open higher as us iran ceasefire boosts global sentiment stock market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market : गुंतवणूकदार मालामाल! 5 वर्षांत ‘या’ शेअरने दिला तब्बल 1092 % रिटर्न
1

Stock Market : गुंतवणूकदार मालामाल! 5 वर्षांत ‘या’ शेअरने दिला तब्बल 1092 % रिटर्न

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी
2

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती  काय ?
3

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती काय ?

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या
4

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.