Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे 10 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा आशावाद निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 08:45 AM
Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील तेजी आणि गिफ्ट निफ्टी 23,900 च्या आसपास ट्रेड करत असल्यामुळे भारतीय शेअर बाजार आज गॅप-अप ओपनिंगसह वाढीची सुरुवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • गुरुवारी बाजारात मोठी घसरण झाली असली तरी ती तात्पुरती मानली जात असून अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दबावानंतर आता पुन्हा रिकव्हरीचे संकेत दिसत आहेत.
  • तज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी अनेक शेअर्सची शिफारस केली असून गुंतवणूकदारांना योग्य संधी साधून या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये नफा मिळू शकतो.
India Share Market Update: १० एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ८१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २३,९४२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली; लेटेस्ट भाव पाहूनच घ्या खरेदीचा निर्णय

गुरुवारी, अमेरिका-इराण युद्धविराम अधिक काळ टिकेल या आशेला तडा गेल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,८०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ९ ३१.२५ अंकांनी, म्हणजेच १.२० टक्क्यांनी घसरून ७६,६३१.६५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२२.२५ अंकांनी, म्हणजेच ०.९३ टक्क्यांनी घसरून २३,७७५.१० वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ८८२.२० अंकांनी, म्हणजेच १.५८ टक्क्यांनी घसरून ५४,८२१.७० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजार तज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये बेलराईज इंडस्ट्रीज, बीएसई, गेल, बँक ऑफ बडोदा (बीओबी), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, कमिन्स इंडिया, थर्मॅक्स आणि गुजरात अल्कलीज यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा वेंकटरामन यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

DA Hike Big Update: होळी सरली, एप्रिलचा आठवडाही उलटला; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार?

राजा वेंकटरामन यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये कजरिया सिरेमिक्स लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), केएसबी लिमिटेड, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये जीई वर्नोव्हा टी अँड डी इंडिया, इसजेक हेवी इंजिनिअरिंग, वारी एनर्जीज, सेनोरेस फार्मास्युटिकल्स आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open higher on april 10 positive global cues signal recovery share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात तेजीची शक्यता! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ दमदार शेअर्स
1

Share Market Today: शेअर बाजारात तेजीची शक्यता! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ दमदार शेअर्स

Share Market: मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराची जोरदार उसळी, सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वधारला
2

Share Market: मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराची जोरदार उसळी, सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वधारला

IPO Alert : ऋतिक रोशनसोबत बिझनेस पार्टनर व्हायचंच? तयार रहा, Cult.fit आणतोय 4000 कोटींचा मेगा IPO, वाचा सविस्तर
3

IPO Alert : ऋतिक रोशनसोबत बिझनेस पार्टनर व्हायचंच? तयार रहा, Cult.fit आणतोय 4000 कोटींचा मेगा IPO, वाचा सविस्तर

Share Market मध्ये थरथराट… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्याने मोठा फटका, सेन्सेक्स 1900 अंकांनी धडाम तर निफ्टीचे हाल बेहाल
4

Share Market मध्ये थरथराट… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्याने मोठा फटका, सेन्सेक्स 1900 अंकांनी धडाम तर निफ्टीचे हाल बेहाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.