केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नेमकी वाढ कधी होणार? (Photo Credit- X)
साधारणपणे जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केली जाते. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 28 मार्च रोजी ही घोषणा झाली होती. यंदाच्या विलंबामागे तज्ज्ञांनी खालील प्रमुख कारणे सांगितली आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. केंद्र सरकार सध्या 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) रचनेवर आणि नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनावर काम करत आहे. या तांत्रिक प्रक्रियेमुळे महागाई भत्त्याच्या निर्णयाला विलंब होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI-IW) गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार, यंदा महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे.
ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांची थकबाकी देखील पगारामध्ये मिळणार आहे.
Wipro कडून शेअर बायबॅक प्रस्तावाचा विचार; १६ एप्रिलला मार्च तिमाहीचे निकाल जाहीर
विविध मीडिया रिपोर्ट्स आणि आर्थिक तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकार पुढच्या आठवड्यात (एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात) महागाई भत्ता वाढवण्याची अधिकृत घोषणा करू शकते. नवीन आर्थिक वर्षातील संक्रमण आणि वेतन आयोगातील संरचनात्मक बदलांना अंतिम रूप दिल्यानंतर सरकार ही घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
1. केंद्र सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा करते.
2. याची घोषणा सहसा होळी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाते.
3. कोरोना काळात (2019-2021) महागाई भत्ता 18 महिन्यांसाठी 17 टक्क्यांवर गोठवण्यात आला होता.
4. 31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ तांत्रिकदृष्ट्या संपला असला, तरी पुढील आदेशापर्यंत कर्मचाऱ्यांना याच आयोगाच्या शिफारसींनुसार लाभ मिळत राहतील.






