Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Share Market Update: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारांसह भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टीच्या संकेतांनुसार आज सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू करण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 08:26 AM
Share Market Today: मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Share Market Today: मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील संघर्ष आणि नकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार गॅप-डाउन ओपनिंगसह सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस, हिंदुस्तान झिंक, झी एंटरटेनमेंट आणि पाइन लॅब्स यांसारखे शेअर्स आज गुंतवणूकदारांच्या रडारवर राहू शकतात.
  • बाजार तज्ज्ञांनी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, ॲक्सिस बँक, आयनॉक्स ग्रीन, झेन टेक्नॉलॉजीज आणि व्होल्टाससह काही निवडक शेअर्समध्ये खरेदीची संधी असल्याचे म्हटले आहे.
India Share Market Update: ८ जून रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मोठ्या घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील नव्याने सुरू झालेल्या संघर्षामुळे अमेरिका-इराण युद्ध संपण्याच्या आशा मावळल्या आहेत. याचा परिणाम जागतिक बाजारावर आणि परिणामी भारतीय शेअर बाजारावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ३३४ पॉइंट्सच्या सवलतीवर, २३,११८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीच्याही भावात झाला बदल; जाणून घ्या नवीन किंमती

शुक्रवारी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरणानंतर भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,४०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ११६.६७ अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ७४,२४३.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४९.८५ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून २३,३६६.७० वर स्थिरावला. आज देखील शेअर बाजारात मोठी घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदांराना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अदानी एनर्जी सोल्युशन्स / अदानी एंटरप्रायझेस, अलेम्बिक फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स, क्रिएटिव्ह न्यूटेक, ईएमएस, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग, हिंदुस्तान झिंक, लेन्सकार्ट सोल्युशन्स, पाइन लॅब्स, पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्रीसाठी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, ॲक्सिस बँक आणि आयनॉक्स ग्रीन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.

Defense Stocks : 3.5 लाख कोटींची ऑर्डर बुक! डिफेन्स क्षेत्रातील ‘या’ 3 शेअर्सवर तज्ज्ञांची नजर

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांच्या मते पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदार झेन टेक्नॉलॉजीज, व्होल्टास, व्हीबीएल हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार ग्रीव्हज कॉटन लिमिटेड, सारेगामा इंडिया लिमिटेड, एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड, अपोलो पाईप्स लिमिटेड आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स हे स्टॉक्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market may open lower today at 8 june 2026 experts highlight key stocks to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स
1

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या
2

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?
3

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम
4

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.