Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instamart : डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी सुविधा! Yulu-Yuma Energy सोबत बॅटरी स्वॅपिंगचा करार

Instamart : Instamart ने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने Yulu आणि Yuma Energyसोबत भागीदारी केली आहे. PODs जवळ बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्यासोबतच Yuluच्या इलेक्ट्रिक दुचाकी वापरणाऱ्या पार्टनर्सना रेंटल कॅशबॅक इन्सेंटिव्ह दिले जात आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 23, 2026 | 05:42 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • PODs जवळच मिळणार बॅटरी स्वॅपिंगची सुविधा
  • Yulu सोबत EV वापरणे होणार अधिक परवडणारे
  • EV इकोसिस्टम मजबूत करण्यावर Instamartचा भर
Instamart : क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या Instamart ने लास्ट-माइल डिलिव्हरी अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीवर मोठा भर दिला आहे. डिलिव्हरी पार्टनर्ससाठी बॅटरी स्वॅपिंगची सुविधा अधिक जवळ उपलब्ध करून देण्यासाठी Instamart ने Yulu आणि Yuma Energy सोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वापरणाऱ्या रायडर्सचा चार्जिंगसाठी जाणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर EV वापरण्याचा सुरुवातीचा खर्च आणि चार्जिंगमुळे होणारा डाउनटाइम कमी करण्यावरही कंपनीचा भर आहे. लास्ट-माइल डिलिव्हरीमध्ये EV चा वापर वाढवण्यासाठी वाहनांची उपलब्धता आणि ऊर्जा सुविधा या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरत आहेत.

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

PODs जवळच मिळणार बॅटरी स्वॅपिंगची सुविधा

Instamart आणि Yuma Energy यांच्या भागीदारीअंतर्गत Instamart आपल्या PODs म्हणजेच डार्क स्टोअर्समध्ये Yuma च्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्ससाठी जागा उपलब्ध करून देत आहे. या सुविधेचे पहिले स्टेशन या महिन्याच्या सुरुवातीला Instamart च्या एका POD येथे सुरू करण्यात आले. Yuma Energy सध्या 2,000 हून अधिक बॅटरी स्वॅपिंग युनिट्स चालवते.

एका बॅटरीच्या स्वॅपिंगसाठी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळे दिवसभरात मोठे अंतर कापणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना चार्जिंगसाठी बराच वेळ थांबण्याची गरज कमी होऊ शकते. PODs जवळच स्वॅपिंग स्टेशन उपलब्ध झाल्याने प्रवास आणि प्रतीक्षा वेळेत दररोज 60 मिनिटांपर्यंत बचत होण्याची शक्यता आहे.

Yulu सोबत EV वापरणे होणार अधिक परवडणारे

Instamart ने Yulu सोबतही भागीदारी केली असून, Yulu च्या इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना रेंटल कॅशबॅक इन्सेंटिव्ह दिले जात आहेत. EV कडे वळताना येणारा सुरुवातीचा आर्थिक भार कमी करणे आणि पेट्रोलच्या वाढत्या खर्चाचा परिणाम कमी करणे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. मे 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून हजारो डिलिव्हरी पार्टनर्सना त्याचा लाभ मिळाला आहे. सहभागी पार्टनर्सच्या रेंटल खर्चात 30 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Mumbai Real Estate Market : तब्बल 711 कोटींची डील! फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच केला खरेदी…

EV इकोसिस्टम मजबूत करण्यावर Instamartचा भर

Instamart, Swiggy सोबत मिळून देशभरातील 50 हून अधिक EV पार्टनर्ससोबत काम करत आहे. या माध्यमातून डिलिव्हरी पार्टनर्सना इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. Yulu कडून वाहनांची उपलब्धता आणि Yuma Energy कडून बॅटरी स्वॅपिंगची सुविधा मिळत असल्याने EV वापरातील दोन महत्त्वाचे अडथळे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहनाचा खर्च, बॅटरीची उपलब्धता आणि चार्जिंगचा वेळ या तिन्ही बाबींची सांगड घालत लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीचा वापर वाढवण्याची Instamartची योजना आहे.

Web Title: Instamart major facility for delivery partners battery swapping agreement signed with yulu yuma energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • electric bike
  • Home Delivery
  • Latest Marathi News
  • Marathi News

संबंधित बातम्या

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
1

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
2

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
3

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण
4

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.