Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

InsurTech And Life Insurance : पॉलिसी काढणं आता झटपट! इन्शुरटेक आणि तंत्रज्ञानामुळे विमा खऱ्या अर्थाने घराघरांपर्यंत पोहोचणार?

InsurTech And Life Insurance : भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी, देशातील जीवन विम्याचे प्रमाण अजूनही जागतिक सरासरीच्या तुलनेत बरेच कमी आहे. विशेषतः ग्रामीण भागात विम्याचे संरक्षण नसलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 26, 2026 | 02:56 PM
एआयमुळे बदलणार विम्याचे भविष्य! ( सौजन्य - Chatgpt )

एआयमुळे बदलणार विम्याचे भविष्य! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • एआयमुळे बदलणार विम्याचे भविष्य!
  • ग्रामीण भारतापर्यंत विमा पोहोचणार
  • यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत होतेय?
InsurTech And Life Insurance : जीवन विमा हा आर्थिक नियोजनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा तुमच्या बाबतीत एखादी अनपेक्षित घटना घडते, तेव्हा तुमच्या कुटूंबातील प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी हवे असलेले आर्थिक स्वातंत्र्य जीवन विमाच प्रदान करतो. तरीही संपूर्ण भारतात विमारुपी स्वातंत्र्य अजूनही बहुतांश लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. ( InsurTech And Life Insurance ) 

Birla Estates : पुण्यातील हिंजवडीत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! बिर्ला इस्टेट्सचा मोठा निर्णय; 1650 कोटींचा Real Estate Project

विमा बाजारपेठांपैकी भारत ही जगातील एक प्रमुख बाजारपेठ

भारत ही जगातील सहावी सवार्धिक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि वेगाने वाढणाऱ्या विमा बाजारपेठांपैकी भारत ही जगातील एक प्रमुख बाजारपेठ ठरली आहे. २०२६ पर्यंत भारतीय विमा बाजारपेठेचा आकार २२२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. तरीही, या प्रभावी वाढीच्या मार्गात अद्यापही अडथळा दिसत आहे. जीवन विम्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२३ मधील ३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.८ टक्क्यांवर आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आणखी घसरून २.७ टक्क्यांवर आले आहे.

हे आकडे जागतिक सरासरीच्या सात टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहेत. भारताची लोकसंख्या अवाढव्य असून बहुतांश भारतीय विमा कवचाविना जगत आहे. त्यांना विम्याचे पुरेसे संरक्षण नाही, हे सध्याचे वास्तव यातून स्पष्टपणे दिसून येते.

समाजाच्या मोठ्या घटकापर्यंत आर्थिक सुरक्षा

ग्रामीण भारताचे उदाहरण विचारात घेऊ या . ग्रामीण भारताला आपण अनेकदा ‘भारत’ म्हणतो. इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IBAI) च्या अहवालानुसार, देशाची जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि त्यापैकी १० टक्क्यांहून कमी लोकांकडे जीवन विमा संरक्षण कवच आहे. विमा अधिक सुलभ बनवणे आणि समाजाच्या मोठ्या घटकापर्यंत आर्थिक सुरक्षा पोहोचवणे, हे अजुनही एक मोठे आव्हान आहे, परंतु त्याचबरोबर विम्याच्या विस्तारासाठी भारतात अमाप संधी आहेत, या दोन बाबी या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येतात.

विमा संरक्षणातील दरी भरून काढण्यासाठी केवळ पारंपारिक वितरण मॉडेलपेक्षा तातडीने वेगळे पावले उचलण्याची गरज आहे; यासाठी नाविन्यपूर्ण पर्यायांची गरज आहे. हे पर्याय जागरूकता, परवडण्याची क्षमता आणि विमा योजना ग्राहकांना सहज उपलब्ध होणे, यामधील अडथळे दूर करू शकतील.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

विमा क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आणि तो लोकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी इन्शुरटेक म्हणजेच विमा तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतात विम्याचा प्रसार कमी असलेल्या भागांमध्ये किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. विमा कंपन्यांच्या कामात वेग आणि अचूकता आणण्यासाठी अल्गोरिदम (गणितीय नियम) आणि एपीआय (वेगवेगळ्या सॉफ्टवेअरना जोडणारे तंत्रज्ञान) यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे ग्राहकांना विमा योजना नीट समजून घेणे, तो ऑनलाइन किंवा सहजतेने खरेदी करणे आणि पॉलिसी घेतल्यानंतर मिळणाऱ्या सेवा अत्यंत सोप्या व पारदर्शक पद्धतीने मिळणे शक्य होत आहे.

तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जीवन विम्याशिवाय कोणतेही आर्थिक नियोजन पूर्ण होत नाही. जेव्हा तुमच्या बाबतीत एखादी अनपेक्षित घटना घडते, तेव्हा तुमच्या कुटूंबातील प्रियजनांचे संरक्षण करण्याचे आवश्यक असलेले आर्थिक स्वातंत्र्य जीवन विमाच प्रदान करतो.

एआय आणि तंत्रज्ञानाची ताकद

आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञानाच्या बळावर, ‘भारतभर’ म्हणजेच मेट्रो किंवा मोठ्या शहरांप्रमाणेच आता देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी जीवन विमा सुलभपणे उपलब्ध करून देण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी विमा पॉलिसी खरेदी करताना प्रस्ताव अर्ज भरावा लागत असे. त्यानंतर तो अर्ज बँकेच्या शाखांमधून विभागीय कार्यालयांपर्यंत आणि पडताळणीसाठी अनेक टप्प्यांतून जावा लागायचा आणि यामध्ये मानवी चुका होण्याची शक्यता खूप जास्त असायची आणि वेळही खूप जायचा.

आता एआयमुळे ही सगळी किचकट प्रक्रिया अत्यंत सोपी, वेगवान आणि विना-अडथळा झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कोणत्याही लांबलचक प्रक्रियेशिवाय खूप कमी वेळात आणि सहजरित्या विमा संरक्षण मिळणे शक्य झाले आहे.

एआयने ग्राहक सेवा अधिक कार्यक्षम

एआयने ग्राहक सेवा अधिक कार्यक्षम बनवली आहे. ग्राहकांना कमी प्रीमियम आकारत मोठ्या संख्येतील ग्राहकवर्गाला सेवा देणाऱ्या जीवन विमा कंपनीचा जरूर विचार करा . अशा कंपन्यांसाठी त्यांची अंतर्गत यंत्रणा (बॅकएंड) म्हणजेच डेटा व्यवस्थापन, कागदपत्रे तपासणे आणि ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची पध्दत अत्यंत वेगवान आणि अचूक असणे आवश्यक असते.

ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी एआय आणि तंत्रज्ञान विमा कंपन्यांना अनेक सुविधा आणि मार्ग पुरवते. प्रथम म्हणजे, चॅटबॉट्स चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे व्यक्ती त्यांच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात.

कोणत्या ग्राहकाशी कशा पद्धतीने संपर्क साधायचा

दुसरे म्हणजे, एआयच्या मदतीने पॉलिसीचे नूतनीकरण अधिक कार्यक्षमतेने केले जाऊ शकते. आजकाल, पॉलिसीचा हप्ता (प्रीमियम) भरण्यासाठी ग्राहकांना सतत फोन करणे नेहमीच फायदेशीर ठरत नाही. बऱ्याचदा ग्राहकांना वारंवार आलेले कॉल्स आवडत नाहीत, तर काहींना आठवण करून दिलेली चालते. प्रत्येक ग्राहकाची आवड वेगळी असल्यामुळे कोणत्या ग्राहकाशी कशा पद्धतीने संपर्क साधायचा, हे ठरवणे गरजेचे असते.

या समस्येवर मात करण्यासाठी, एआयमधील अ‍ॅनालिटिक्सचा वापर करून कंपन्या ज्यांना कॉल किंवा मेसेज करणे योग्य ठरेल, अशा ग्राहकांच्या गटांना अचूक ओळखतात. मानवी हस्तक्षेपाविना, एआय व्हॉइस बॉट्स स्वतः ग्राहकांना फोन करतात आणि त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायला मदत करतात.तिसरे म्हणजे, एआय पारंपारिक मानवी प्रक्रियेच्या तुलनेत सरळ आणि सोप्या दाव्यांची पूर्तता अतिशय वेगाने करतात.

एआयमुळे विमा मंजुरीची प्रक्रिया सोपी

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विमा मंजुरीची अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अतिशय वेगवान, अचूक आणि सुरक्षित झाली आहे. विमा पॉलिसी मंजूर करताना ग्राहकांच्या आरोग्याची कागदपत्रे, आर्थिक स्थिती, त्याला असलेला धोका आणि कागदपत्रांमध्ये कोणती फसवणूक आहे का, हे सगळे तपासावे लागते आणि पूर्वी ही प्रक्रिया खूप किचकट होती. एआय अशा प्रकारचा प्रचंड आणि गुंतागूंतीचा डेटा काही सेकंदांत समजून घेतो आणि विमा कंपनीला वेगाने निर्णय घेण्यासाठी मदत करतो. प्रत्येक ग्राहकाचे स्वरुप आणि गरज वेगळी असते.

एआय प्रत्येक ग्राहकाचा अभ्यास करून त्याच्यासाठी योग्य अशी ‘रिस्क प्रोफाईल’ तयार करतो आणि त्यामुळे धोका ओळखण्याची अचूकता वाढते. पूर्वी एखादी पॉलिसी मंजूर होऊन हातात यायला दिवस किंवा आठवडे लागायचे. पण आता एआयमुळे ही प्रक्रिया काही तास किंवा मिनिटांत पूर्ण होते. अर्जातील माहितीमध्ये काही विसंगती असेल किंवा सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही फसवणूक असेल, तर एआय ती लगेच ओळखू शकतो.

पडद्यामागे एआयचे शक्तिशाली तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आजकाल मोबाईल ॲप्स केवळ माहिती दाखवणारी साधने राहिली नसून, ती अत्यंत स्मार्ट आणि बुद्धिवान बनली आहेत. विमा एजंट किंवा ग्राहकांसाठी असणारे एखादे ॲप दिसायला खूप साधे किंवा सोपे वाटू शकते, पण त्याच्या पडद्यामागे एआयचे शक्तिशाली तंत्रज्ञान काम करत असते. ग्राहकाची पार्श्वभूमी तपासून त्याला किती धोका आहे, याचे अचूक मूल्यांकन हे ॲप करते. ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला कोणती विमा पॉलिसी सर्वात योग्य ठरेल, याची शिफारस हे ॲप करू शकते. ग्राहकाच्या जुन्या डेटाच्या आधारावर फॉर्ममधील माहिती ॲप स्वतःहून आधीच भरून घेत असल्यामुळे वेळ वाचतो. एखादा ग्राहक भविष्यात हप्ता भरणे थांबवेल किंवा त्याची पॉलिसी बंद होईल, हे एआय आधीच ओळखून एजंटला सतर्क करू शकते.

प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आणि कष्टांचा सन्मान

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात जीवन विमा सहज पोहोचवणे आणि वितरित करणे शक्य झाले आहे. देशातील अनेक ग्रामीण व निमशहरी भागांमधील कुटुंबांकडे स्थिर उत्पन्न आणि मुलभूत सुविधा असूनही, बऱ्याचदा अशा भागात विमा कंपन्यांच्या भौतिक शाखा किंवा वैयक्तिक वित्तीय सल्लागार नसतात.

जीवन विम्याचे ‘लोकशाहीकरण’ करण्याचा खरा अर्थ केवळ अधिकाधिक लोकांपर्यंत विमा पोहोचवणे एवढाच नाही, तर आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आणि स्वप्ने बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आणि कष्टांचा सन्मान करणे, हा आहे. कारण प्रत्येकास अशा प्रकारच्या मानसिक शांततेचा अधिकार आहे. जेव्हा प्रत्येकाला सुरक्षित वाटण्याची संधी मिळते, तेव्हाच खरी प्रगती होते.

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील ग्रामीण भागात जीवन विम्याचे प्रमाण किती आहे?

    Ans: इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच IBAI च्या अहवालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असली तरी त्यापैकी १० टक्क्यांहून कमी लोकांकडे जीवन विमा संरक्षण कवच आहे.

  • Que: InsurTech आणि AI मुळे विमा प्रक्रिया कशी सोपी झाली?

    Ans: ग्राहकांना पॉलिसी समजून घेणे, ऑनलाइन खरेदी करणे, चॅटबॉट्सद्वारे २४ तास शंकांचे निरसन आणि अंडररायटिंगची प्रक्रिया काही तास किंवा मिनिटांमध्ये पूर्ण होणे शक्य झाले आहे.

  • Que: विमा क्षेत्रात AI चा वापर करून कोणकोणत्या सेवा अधिक प्रभावी बनवण्यात आल्या आहेत?

    Ans: AI च्या मदतीने पॉलिसीचे अचूक नूतनीकरण, व्हॉइस बॉट्सद्वारे पेमेंट सुलभ करणे, फसवणूक ओळखणे, रिस्क प्रोफाईल तयार करणे आणि Claims पूर्तता अतिशय वेगाने करणे शक्य होत आहे.

Web Title: Insurtech and life insurance in india technology democratization ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • ai
  • Insurance
  • Life Insurance

संबंधित बातम्या

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा
1

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
2

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
3

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

NCERT AI Module for Schools: इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार AI चे धडे; NCERT ने केला नवीन अभ्यासक्रम जाहीर
4

NCERT AI Module for Schools: इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार AI चे धडे; NCERT ने केला नवीन अभ्यासक्रम जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.