
Image
एनसीईआरटीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजनुसार या मॉड्युलमध्ये कॉम्पुटेशनल थिंकिंगला समस्यांची ओळख पटवणे आणि त्या पद्धतशीर तसेच तार्किकतेने सोडवणे हे आहे. याद्वारे विद्यार्थी एआयची आपल्या देैनंदिन आयुष्यात काय भूमिका असते आणि ते काम कसे करते हे समजणे आहे.
शिकण्याची पद्धत रंजक आणि व्यवहारिक बनवण्यासाठी मॉड्युलमध्ये अनुभवात्मक आणि कृतीशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये डिस्कशन, व्यवहारिक तसेच प्रॅक्टिस प्रयोग आणि आत्मचिंतन यांसारख्या उपक्रमाचा समावेश आहे. डिजिटल संसाधनाची कमतरता लक्षात घेता प्रत्येक अॅक्टिव्हिटी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेता येऊ शकेल. यामुळे कमी संसाधने किंवा मर्यादित इंटरनेट असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
या मॉड्युलमध्ये टेक्नोलॉजी ही अधिक सुरक्षित, निष्पक्ष आणि जबाबदारीने वापरण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जागरुकतेवर अधिक भर दिला जाईल. जसे की डिजिटल सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाची गोपनीयता राखणे, इंटरनेटवर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीची निष्पक्ष पडताळणी करणे, तसेच विद्यार्थ्यांनी एआयवर डोळे झाकून विश्वास न ठेवता माहितीतील अचूकता आणि व्हेरिफिकेशन तपासण्यास शिकवणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानवी विवेक, सर्जनशीलता आणि नैतिकतेच्या जबाबदारीबद्दल यामध्ये सांगण्यात आले आहे.
Ans: हे मॉड्युल इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत विकसित करण्यात आले आहे.
Ans: नाही, हे मॉड्युल शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर किंवा AI ची आधीपासून कोणतीही माहिती असणे आवश्यक नाही.
Ans: यामध्ये कॉम्प्युटेशनल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डेटा गोपनीयता, डिजिटल सुरक्षा आणि एआयने दिलेल्या माहितीची अचूकता (AI Content Verification) तपासण्यावर भर दिला जाईल.