Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

कॅनरा रोबेको म्‍युच्‍युअल फंडने कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड लाँच केले. कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे, जी बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रात गुंतवणूक करते.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 26, 2026 | 10:10 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू (फोटो-सोशल मीडिया)

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Canara Robeco Mutual Fund: कॅनरा रोबेको म्‍युच्‍युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात जुनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. ते कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड लाँच करत आहे. ही ओपन-एंडेड इक्विटी योजना बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रात गुंतवणूक करते. या योजनेचा भारतात बचतींचे आर्थिकीकरण आणि कर्ज मागणीमध्‍ये वाढीमधून मालमत्ता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड कर्जदारांच्‍या कर्ज घेण्‍याच्‍या बदलत्‍या वर्तणूकीचा फायदा घेईल, जेथे आता फक्‍त विशिष्‍ट घटनेपुरते मर्यादित न राहता जीवनशैलीमधील गरजांची पूर्तता करण्‍यासाठी देखील कर्ज घेतले जात आहे. लवकर कर्ज घेण्‍याची वृत्ती, दीर्घकालीन कर्ज जीवनचक्र आणि सहजपणे कर्ज उपलब्‍धता यांमुळे देखील क्षेत्रात संधी मोठ्या प्रमाणात वाढल्‍या आहेत.

New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल

या योजनेसाठी न्‍यू फंड ऑफर (एनएफओ) २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होईल आणि १३ मार्च २०२६ रोजी बंद होईल.
”बँकिंग व आर्थिक सेवा भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचे प्रमुख घटक आहेत. या न्‍यू फंड ऑफरच्‍या माध्‍यमातून आम्‍ही गुंतवणूकदारांना या गतीमध्‍ये सहभागी होण्‍याची प्रत्‍यक्ष संधी देत आहोत,” असे कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रजनीश नरूला म्‍हणाले. ”या लाँचमधून गुंतवणूक उपायायोजना तयार करण्‍यावरील आमचा भर दिसून येतो, ज्‍या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती करण्‍यामध्‍ये आणि उज्‍ज्‍वल आर्थिक भविष्‍य घडवण्‍यामध्‍ये मदत करतील.”

ही योजना आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ८० टक्‍के हिस्सा बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल. उर्वरित हिस्सा इतर क्षेत्रांतील इक्विटी, कर्ज साधने (डेब्‍ट), मनी मार्केट साधने आणि इनव्हिट्स (InvITs)मध्ये गुंतवला जाईल. ”कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंडाचा वाढ आणि मूल्‍य/नफा देणारा पोर्टफोलिओ निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच, या योजनेचा संपूर्ण आर्थिक क्षेत्रामध्‍ये स्थिर चक्रवाढ देणारे व्‍यवसाय आणि विकासाला चालना देणारे व्‍यवसाय / व्‍हॅल्‍यू मायग्रेशनमध्‍ये उत्तम संतुलन राखण्‍याचे उद्दीष्‍ट आहे,” असे कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्‍या इक्विटीजचे चीफ इन्‍व्‍हेस्‍टमेंट ऑफिसर श्री. श्रीदत्त भांडवलदार म्‍हणाले. ”आमचा विश्वास आहे की, हा फंड गुंतवणूकदारांना बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील संभाव्‍य विकासाचा फायदा घेण्‍याची संधी देऊ शकतो,” असे ते पुढे म्‍हणाले.

Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

ही योजना बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रात लक्ष केंद्रित करत भारतातील आर्थिकीकरण व क्रेडिट वाढीमध्‍ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अनुकूल आहे. गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील संभाव्‍य जोखीम आणि इक्विटी बाजारपेठेतील चढ-उतार देखील समजून घेणे आवश्‍यक आहे. ”बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्राचे भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विकासामध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे. कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड आमच्‍या थीम/क्षेत्र आधारित फंड ऑफरिंगचा विस्‍तार करतो, तसेच आम्‍ही गुंतवणूकदारांना देणाऱ्या पर्यायांमध्‍ये वाढ करतो. या फंडामध्‍ये गुंतवणूक केल्‍यास गुंतवणूकदारांना भारताच्‍या विकासगाथेमध्ये सहभागी होण्‍याची संधी मिळू शकते, तसेच त्‍यांच्‍यासाठी दीर्घकाळापर्यंत मालमत्ता निर्माण होऊ शकते,” असे कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे सेल्‍स अँड मार्केटिंगचे प्रमुख श्री. गौरव गोयल म्‍हणाले.

कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड तुलना निफ्टी फायनान्शियल सर्विसेस इंडेक्स (टोटल रिटर्न इंडेक्‍स) या बेंचमार्कशी केली जाईल. न्यू फंड ऑफर कालावधीत किमान गुंतवणूक ५,००० रूपयांपर्यंत असेल आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. इक्विटीजचे चीफ इन्व्‍हेस्‍टमेंट ऑफिसर श्री. श्रीदत्त भांडवलदार आणि इक्विटीजचे फंड मॅनेजर श्री. अमित कदम या फंडाचे व्यवस्थापन पाहतील.

Web Title: Investment opportunity in banking and finance canara robeco launches nfo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • Mutual Fund

संबंधित बातम्या

Mutual Funds Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? या चुका टाळल्यात तरच वाढेल पैसा; जाणून घ्या सविस्तर
1

Mutual Funds Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? या चुका टाळल्यात तरच वाढेल पैसा; जाणून घ्या सविस्तर

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000  मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP?  वाचा सविस्तर
2

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000 मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.