Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा
Bank Of England: मध्य लंडनमध्ये एक जागा आहे, जिथे मेट्रोचा बोगदा सरळ जाण्याऐवजी अचानक वळतो. याचे कारण म्हणजे, बँक ऑफ इंग्लंडची विशाल भूमिगत तिजोरी. ज्याला ‘शहरातील शहर’ असेही म्हणतात. बँकेच्या एकूण मजल्याच्या जागेपैकी जवळजवळ ४०% जागा भूमिगत आहे आणि या नेटवर्कच्या मध्यभागी युरोपमधील सर्वात मोठी सोन्याची तिजोरी आहे, असा दावा केला जातो. लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत तिजोरीत ६० हून अधिक देशांचे ५,००० टनांहून अधिक सोने आहे. या तिजोरीत युरोपमधील सर्वात मोठे साठवणुकीची जागा आहे. जी फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्क नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बँक ऑफ इंग्लंडकडे एकूण १२ भव्य तिजोरी आहेत, प्रत्येक तिजोरीत हजारो सोन्याच्या बार आहेत. एकूण ५,००० टनांपेक्षा जास्त सोने येथे साठवले आहे. तुलनेने, ही रक्कम अमेरिकेतील फोर्ट नॉक्सपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते, तर न्यूयॉर्क फेडकडे अंदाजे १,००० टन अधिक साठा आहे. येथे साठवलेल्या प्रत्येक सोन्याच्या बारचे वजन ४०० ट्रॉय औंस (सुमारे १२-१३ किलोग्रॅम) असते. प्रत्येक बारला एक अनुक्रमांक किंवा बारकोड असतो. जेव्हा सोने खरेदी किंवा विक्री केली जाते, तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये बार अपरिवर्तित राहतो. फक्त त्याचा कोड नवीन मालकाकडे हस्तांतरित केला जातो.
विशेष म्हणजे, बँक ऑफ इंग्लंडकडे या संपूर्ण साठ्याचा बहुतांश भाग नाही. बँकेकडेच फक्त दोन सोन्याच्या बार प्रदर्शनात आहेत. ब्रिटिश सरकार येथे अंदाजे ३०० टन सोने ठेवते. ६० हून अधिक देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांचे सोने येथे साठवतात. ही तिजोरी जगातील सरकारी तिजोरींचे केंद्र आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत तिजोरी केवळ सोन्याचे भांडार नाहीत तर जागतिक आर्थिक आणि राजकीय शक्तीचे प्रतीक आहेत.
Home Credit India ची संगीतमय मोहिम! कर्जाबद्दलचा संकोच होणार दूर, #KahoEMIKoHaan
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, तत्कालीन अर्थमंत्री गॉर्डन ब्राऊन यांनी ब्रिटनच्या सोन्याच्या साठ्यापैकी निम्म्याहून अधिक विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सोन्याची किंमत सुमारे २७५ डॉलर्स प्रति तोळा होती. आज, किंमत जवळजवळ ५,००० डॉलर्स प्रति तोळ्यापर्यंत पोहोचली आहे. एका विश्लेषणानुसार, त्या विक्रीमुळे ब्रिटनला अंदाजे ४७ अब्ज डॉलर्स (अंदाजे रु. ४,२७,४३७ लाख कोटी) नुकसान झाले. बैंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर अॅडूबेली म्हणतात की, त्यावेळी, साठा अधिक उपयुक्त करण्याबद्दल वादविवाद सुरू होता, कारण सोने तिजोरीत राहते आणि उत्पन्न देत नाही.






