
RBI ची गुंतवणूकदारांसाठी भन्नाट सुविधा! ( सौजन्य - Chatgpt )
आतापर्यंत, सीएएसमध्ये केवळ डिमॅट खात्यांमधील गुंतवणुकीचा तपशील दिला जात असे, जसे की स्टॉक्स, बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंड असा सविस्तर गोष्टींचा समावेश असायचा. पण आरबीआय आणि सेबी यांच्या समन्वयाने, या नवीन नियमांतर्गत बँक ठेवींचाही समावेश केला जाईल.
अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्कद्वारे लागू करण्यात आली आहे. ही नवीन प्रणाली ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात येत आहेत. ज्यामुळे तुमचा संपूर्ण आर्थिक पोर्टफोलिओ एकाच डॅशबोर्ड किंवा स्टेटमेंटवर पाहता येणार आहे. त्यामुळे सगळा व्याप कमी होणार असून सगळं एकत्रित पाहता येणार आहे.
या मोठ्या बदलाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की, तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमधील तुमच्या एफडी किंवा ठेवींचा मागोवा घेण्यासाठी अनेक बँकिंग ॲप्स किंवा स्टेटमेंट्स चाळण्याची गरज भासणार नाही. यामुळे कर्ज प्रक्रियेलाही लक्षणीय गती मिळेल आणि ती सोपी होईल, कारण तुम्ही तुमची सर्व आर्थिक माहिती एकाच ठिकाणाहून कर्जदात्यांसोबत सुरक्षितपणे शेअर करू शकाल. शिवाय, खातेधारकाच्या मृत्यूनंतर, वेगवेगळ्या बँकांमध्ये विखुरलेल्या एफडी आणि गुंतवणुकी शोधणे हे कुटुंबांसाठी पूर्वी एक मोठे आव्हान होते. आता, एकच स्टेटमेंट नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनेशन आणि दाव्याची पूर्तता म्हणजेच क्लेम सेटलमेंट यांसारखी कामे आणखी सोपी होणार आहेत.
Ans: आर्थिक माहिती एकत्रित खाते विवरणामध्ये म्हणजे CAS मध्ये समाविष्य केली जाणार आहे.
Ans: ही नवीन प्रणाली ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
Ans: तुमची सर्व आर्थिक माहिती एकाच ठिकाणावर मिळेल.