१२ हजार ग्राहकांना मिळणार 'स्मार्ट' सोलरचा लाभ ( सौजन्य - सोशल मीडिया )
PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!
महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणमध्ये पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, नांद्रा, लासगाव आणि लोहारा या पाच सेक्शनचा समावेश आहे. या पाच सेक्शनअंतर्गत सुमारे 45 ते 46 गावांतील 18 हजार 500 घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 12 हजार 6 ग्राहकांनी शासनाच्या ‘स्मार्ट’ रूफटॉप सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
या योजनेंतर्गत 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार रक्कम भरावी लागणार आहे. बीपीएल प्रवर्गातील ग्राहकांना 2 हजार 500 रुपये, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांना 5 हजार रुपये, तर ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ग्राहकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसविण्याची प्रक्रिया केली जाते.
सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम 1 किलोवॅट सोलर ॲक्टिव्हेशनसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी वीज बिल आणि आधारकार्ड ही प्रमुख कागदपत्रे आवश्यक आहेत. एकाच वेळी साधारण दहा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडरच्या माध्यमातून सोलर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. ही प्रक्रिया साधारण आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सोलर सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा वीज बिलावर थेट परिणाम दिसून येतो.
विशेष म्हणजे, 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही सोलरचा लाभ मिळणार आहे. सोलर निर्मिती आणि वापरानुसार जमा होणाऱ्या युनिटचा ग्राहकांना फायदा होतो. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
ज्या ग्राहकांचे वीज बिल अधिक आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापरानुसार 1 किलोवॅट, 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसविता येणार आहे. त्यामुळे अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही त्यांच्या गरजेनुसार सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Aadhaar Card वरील नाव बदलणे आता सोपं नाही! UIDAI कडून नवीन SOP जारी; ‘या’ गोष्टी झाल्या अनिवार्य






