Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल, ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार

भारताचे द्योगिक क्षेत्र सध्या मोठ्या धक्क्यांचा सामना करत आहे. त्यात सल्फ्युरिक ॲसिडची उपलब्धता झपाट्याने कमी होत असून, त्यामुळे अनेक उद्योगांमध्ये चिंता वाढली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 11, 2026 | 08:41 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सल्फ्युरिक ॲसिडची उपलब्धता झपाट्याने कमी
  • अनेक उद्योगांमध्ये चिंता वाढली
  • पश्चिम आशिया आणि चीनमुळे अडचणींमध्ये भर
Sulphuric Acid Shortage : भारताचे द्योगिक क्षेत्र सध्या मोठ्या धक्क्यांचा सामना करत आहे. त्यात सल्फ्युरिक ॲसिडची उपलब्धता झपाट्याने कमी होत असून, त्यामुळे अनेक उद्योगांमध्ये चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील १५-२० दिवसांत साठा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होईल आणि कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

Health Insurance New Rules: आता हॉस्पिटलची अवाढव्य बिलं होणार कमी! हेल्थ इन्शुरन्ससाठी ‘सुपर पॅनेल; पाहा काय बदलणार?

सल्फरच्या पुरवठ्यातील व्यत्यय

या संकटाचे मुख्य कारण बनले आहे. सल्फ्यूरिक ऍसिडच्या उत्पादनासाठी लागणारा मुख्य कच्चा माल असलेल्या सल्फरची कमतरता हे याचे मूळ कारण आहे. सल्फरचा पुरवठा कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाशी निगडित आहे. जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येताच, सल्फरच्या उपलब्धतेवर परिणाम होतो, ज्याचा थेट परिणाम सल्फरच्या उत्पादनावर होतो.

पश्चिम आशिया आणि चीनमुळे अडचणींमध्ये भर

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे सल्फरच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आला आहे. चीनने मे महिन्यापासून सल्फ्यूरिक ॲसिडची निर्यात थांबवण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेतील तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या भारतावर या निर्णयाचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

खत उद्योगासमोरील सर्वात मोठा धोका

डीएपी (DAP) आणि एनपीके (NPK) सारख्या फॉस्फेट खतांच्या उत्पादनात सल्फ्यूरिक ॲसिडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच्या तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कृषी आणि अन्नसुरक्षेवर थेट परिणाम होईल. असा अंदाज आहे की, लाखो हेक्टर जमिनीवरील पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात अन्नसंकटाचा धोका वाढेल.

धातू आणि इतर उद्योगही संकटात

हे रसायन धातू प्रक्रियेत, विशेषतः तांबे आणि जस्त काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला, तर तांब्याच्या उत्पादनात घट होऊ शकते, ज्याचा परिणाम चांदीवरही होईल, कारण चांदीचा मोठा भाग तांब्यापासून मिळवला जातो. वस्त्रोद्योग, डिटर्जंट, रसायने आणि पेट्रोलियम यांसारख्या क्षेत्रांवरही परिणाम होईल.

भविष्यात महागाई वाढू शकते

जर हे संकट दीर्घकाळ टिकले, तर त्याचा परिणाम केवळ उद्योगांपुरता मर्यादित राहणार नाही. घटलेल्या उत्पादनामुळे बाजारात वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन किमती वाढू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर पुरवठा लवकरच पूर्ववत झाला नाही, तर या समस्येचा परिणाम संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना स्पष्टपणे जाणवतील.

Health Insurance New Rules: आता हॉस्पिटलची अवाढव्य बिलं होणार कमी! हेल्थ इन्शुरन्ससाठी ‘सुपर पॅनेल; पाहा काय बदलणार?

Web Title: Latest sulphuric acid shortage could ripple across indian companies marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News : १५ मुलांसह १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, ११६ बेपत्ता ;जिबूतीच्या किनाऱ्याजवळ भीषण बोट दुर्घटना
1

Breaking News : १५ मुलांसह १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, ११६ बेपत्ता ;जिबूतीच्या किनाऱ्याजवळ भीषण बोट दुर्घटना

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
2

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
3

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
4

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.