Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Nagpur Sports : नागपूरमधील चर्चेत असलेल्या हॉकी मैदानावर आता पुन्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. मैदानाच्या लीज आणि व्यवस्थापनावरून निर्माण झालेल्या वादानंतर याच मैदानावर स्पर्धा भरवण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे हॉकीपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 11, 2026 | 02:55 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • राजकीय दबावाचा आरोप
  • अहवालाच्या आधारे भाडेपट्टा रद्द
  • व्हीएचए कडूनही स्पर्धेचे आयोजन
Nagpur sports : अमरावती मार्गावरील विदर्भ हॉकी असोसिएशनच्या (व्हीएचए) हॉकी मैदानाबाबतचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. जून महिन्यात जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात जिल्हा क्रीडा विभागाने हे मैदान खेळासाठी अयोग्य असल्याचे नमूद केले होते. मात्र, आता याच मैदानावर शालेय हॉकी स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याने तत्कालीन अहवाल आणि मैदानाचा भाडेपट्टा रद्द करण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २४७ अंतर्गत दाखल व्हीएचएचे अपील अपर विभागीय आयुक्तांनी फेटाळून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. यानुसार ३.८० हेक्टर नजूल जमिनीचा भाडेपट्टा रद्द करून जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय कायम राहिला.

तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार केल्याचे सांगितले, शशिकांत कळबे यांनी हा अहवाल आपल्या कार्यकाळात तयार झाला नसल्याचे स्पष्ट केले.

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

राजकीय दबावाचा आरोप

व्हीएचएचे प्रशासक त्रिलोकीनाथ सिधरा यानी मैदानाचा ताबा घेण्याची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून अहवाल तयार करवून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधूनही केवळ आश्वासने मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

अहवालाच्या आधारे भाडेपट्टा रद्द

व्हीएचएला या मैदानाचा भाडेपट्टा २०३७ पर्यंत मंजूर होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने मुदत संपण्यापूर्वीच तो रद्द करण्याची कारवाई केली. तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या अहवालात मैदानावरील असमतोल जमीन, खड्डे, देखभालीचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता यांचा उल्लेख होता.

त्यानंतर नजूल विभागाने मैदानाच्या ताब्यासंदर्भात नोटीस बजावली. आता त्याच मैदानावर स्पर्धा होत असल्याने, मैदान अयोग्य ठरविण्याचा निकष काय होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपील फेटाळले; कायदेशीर लढा सुरू.

Nagpur News : पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

व्हीएचए कडूनही स्पर्धेचे आयोजन

२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्हीएचएने याच मैदानावर विदर्भस्तरीय हॉकी स्पर्धा घेतली होती. त्यात नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरसह विविध जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. व्हीएचएचे समन्वयक कृष्णा जोशी यांनी मैदान खेळासाठी योग्य असल्याचे सांगितले.

अपील २८ सप्टेंबरला फेटाळल्यानंतर अपर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना पत्र देऊन पुढील अपील करण्यासाठी उपलब्ध मुदतीपर्यंत मैदानावरील कारवाई थांबविण्याची विनंती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकाच मैदानाबाबत चार महिन्यांच्या अंतराने समोर आलेल्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे क्रीडा विभागाच्या अहवालाचा आधार आणि मैदानाचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Web Title: Nagpur sports tournaments to be held at that very hockey ground nowcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur District
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
2

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
4

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.