Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था, पाणीटंचाईचे संभाव्य संकट आणि वादळी पावसाची भीती अशा समस्यांचा सामना सध्या म्हसळामधील नागरिकांना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 02:50 PM
Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होताच उन्हाचा तडाखा वाढू लागला
  • पावसाच्या विश्रांतीचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर
  • पाणीपुरवठ्याच्या उपलब्धतेबाबत नागरिकांची चिंता वाढली
म्हसळा: या वर्षी झालेल्या पावसाचे प्रमाण आणि त्यातच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होताच उन्हाचा तडाखा वाढू लागला असून प्रचंड उखाडा, दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था, पाणीटंचाईचे संभाव्य संकट आणि वादळी पावसाची भीती अशा दुहेरी-तिहेरी संकटांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. बदलत्या हवामानाच्या या लहरींमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या अनिश्चिततेच्या चक्रव्यूहात नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

म्हसळा हा कोकणातील ‘पर्जन्यबहुल तालुका’ म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी ४ ते ४.५ हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाचे आगमन उशिरा होणे, काही काळातच पावसाच्या विश्रांतीचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाल्याचे चित्र आहे. यंदा पावसाची नोंद ३६९० मिमी झाली असली तरीही त्यात सातत्य नसल्याने भात, नाचणी, वरी या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.  (फोटो सौजन्य – AI Created) 

शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताला फटका

अनेक शेतक-यांच्या हातात अपेक्षित उत्पादन येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच माकडे, रानडुकरे आणि अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी खरीप हंगाम हा वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असतो. पिकांची वाढ अपेक्षित न होणे, उत्पादन घटण्याची शक्यता आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धनाकडे लक्ष

पावसावर अवलंबून असलेल्या ग्रामीण शेती व्यवस्थेत हवामानातील अनिश्चितता आता शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात भरलेले पाणीसाठे, विहिरी, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोत यांची स्थिती आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना चिंता वाटू लागली आहे. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिल्यास पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याकडे प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

कात्रीत सापडला शेतकरी

एकीकडे पिकांना पाण्याची गरज असताना दुसरीकडे अचानक वादळी पाऊस किया जोरदार सरी कोसळल्यास हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतक-यांना सतावत आहे. शेतकरी पावसाची आशा करतात, पण त्याच वेळी अवकाळी किंवा वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे पाऊस पडला तरी चिंता आणि पाऊस थांबला तरी चिंता अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

वाढता तडाखा; खरीप पिकांवर संकट

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्थिती तपासणे, शेतीच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे आणि आवश्यक उपाययोजना वेळेत राबविणे गरजेचे आहे. हवामानविषयक अधिकृत अंदाज नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

एकूणच, ऑक्टोबर हिटचा वाढता तडाखा, खरीप पिकांवरील संकट, संभाव्य पाणीटंचाई आणि वादळी पावसाची धास्ती यामुळे म्हसळा तालुक्यातील नागरिक व शेतकरी चिंतेच्या वातावरणात आहेत. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा सामना करताना आणि या संकटातून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचे लक्ष हवामानातील बदल आणि प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: October heat hits mhasla kharif crops under stress farmers fear water shortage and stormy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
4

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.