Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल Hilton खरोखरच ‘शापित’? आधी रोनाल्ड रीगन आता Donald Trump! राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, परिणाम काय होणार?

वॉशिंग्टनमधील ऐतिहासिक 'हिल्टन हॉटेल' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे मात्र यावेळी, त्याचे कारण त्याची भव्यता नसून, गोळीबाराची एक थरारक घटना हे आहे. 'व्हाइट हाउस कॉरेस्पॉन्डन्ट्स डिनर' सुरू असताना हा गोळीबार झाला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 26, 2026 | 02:54 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक ‘हिल्टन हॉटेल’ पुन्हा एकदा चर्चेत
  • म्हणून प्रशासनातर्फे महत्त्वाचे डिनर्स याच ठिकाणी
Washington Hilton Iconic : वॉशिंग्टनमधील ऐतिहासिक ‘हिल्टन हॉटेल’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे मात्र यावेळी, त्याचे कारण त्याची भव्यता नसून, गोळीबाराची एक थरारक घटना हे आहे. ‘व्हाइट हाउस कॉरेस्पॉन्डन्ट्स डिनर’ सुरू असताना हा गोळीबार झाला. या कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या गोळीबारात ट्रम्प सुखरूप राहिले. हे हिल्टन तेच हॉटेल आहे, ज्याच्या बाहेर १९८१ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ज्यामुळे या वास्तूला ‘शापित’ म्हटले जात आहे.

जास्त परताव्याच्या नादात सुरक्षा विसरू नका! FD की Mutual Fund? Emergency Fund साठी कोणता पर्याय ठरतो सर्वोत्तम?

रीगन यांच्यावरील तो भयाण हल्ला

अगदी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच ३० मार्च १९८१ रोजी जॉन हिंकली ज्युनियर याने, याच हॉटेलच्या अगदी बाहेर, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना हॉटेलच्या ‘T Street NW’ येथील प्रवेशद्वारापाशी घडली होती; ज्यामुळे स्थानिक लोकांनी मग ते गंमतीने असोत किंवा भीतीपोटी असोत. या हॉटेलला ‘हिंकली हिल्टन’ असे नाव दिले आहे. आता, ट्रम्प यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर, लोकांना असा प्रश्न विचारात यायला लागला आहे की खरंच हे ठिकाणी राष्ट्राध्यक्षांसाठी खरोखरच शापित आहे? हा प्रश्न एका बाजूला पण या हॉटेलची सुंदरता जगभरातील व्यक्तींना आकर्षित करते.

हॉटेलची सुंदरता आकर्षक

वॉशिंग्टन हिल्टनची पायाभरणी १९६२ मध्ये करण्यात आली आणि १९६५ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. याची वास्तू रचना इतकी अद्वितीय आहे की, ते वॉशिंग्टन, डी.सी. चे एक प्रतिष्ठित प्रतीक icon बनले आहे. उद्घाटनापासूनच, हे हॉटेल जगभरातील राष्ट्राध्यक्ष, मान्यवर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींची पसंतीची निवड राहिले आहे.

म्हणून प्रशासनातर्फे महत्त्वाचे डिनर्स याच ठिकाणी

या हॉटेलचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे त्याचा ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेला, खांबांविना असलेला विशाल बॉलरूम. दीर्घकाळापर्यंत, हा हॉल शहरातील खांबांविना असलेला सर्वात मोठा सभागृह राहिला आणि याच ठिकाणी ‘व्हाइट हाउस कॉरेस्पॉन्डन्ट्स असोसिएशन डिनर’ व ‘नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट’ यांसारखे अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. या वास्तूत तीन मजल्यांवर विभागलेली, १,१८,००० चौरस फुटांहून अधिक जागा बैठका आणि विविध कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे. नेमक्या याच कारणामुळे, अमेरिकन प्रशासनातर्फे आयोजित केले जाणारे मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे डिनर्स नेहमीच याच ठिकाणी पार पडतात.

पाहुण्यांसाठी स्पेशल स्थानिक खाद्यपदार्थ

येथे भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी, ‘फोर ओक्स’ रेस्टॉरंट स्थानिक चवींनी नटलेला खाद्यपदार्थांचा मेनू सादर करतं, तर ‘मॅकलेलन स्पोर्ट्स बार’ १५ स्क्रीनवर सामने पाहण्यासाठीही सुविधा दिलेली आहे. येथील ‘साइडकार’ आणि ‘डिस्टिंक्ट लाइन कॅफे’हे त्यांच्या हलक्या स्टाटरसाठी आणि पेयांसाठी बरेच लोकप्रिय आहे.

राजेशाही अनुभव देणारं हॉटेल

जेव्हा आलिशान सूट्सचा विषय येतो, तेव्हा येथील ‘चीफ ऑफ स्टेट सूट’ सर्वात उत्कृष्ट अनुभव देतो. हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर स्थित असलेला हा सूट संगमरमर, सोने आणि बर्च लाकूड यांसारख्या घटकांनी सुशोभित केलेला आहे. यात एक किंग-साईज बेड आणि आधुनिक रचना असून, तो पाहुण्यांना खरोखरच एक राजेशाही अनुभव देतो.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; खरेदीपूर्वी नक्की तपासा आजचे भाव

Web Title: Latest washington hilton iconic double arch design grand ballroom and luxury suites shooting see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • Donald Trump
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
2

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.