
महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे
India financing market: देशात पायाभूत सुविधांची वेगाने होत असलेली उभारणी, मालवाहतूकीत जोरदार उसळी आणि ग्रामीण भागात रोखतेच्या प्रवाहात सुधारणा आदी कारणांमुळे भारतात व्यावसायिक वाहन (सीव्ही) खरेदीसाठीच्या वित्तपुरवठा बाजारपेठेने आपली ताकद कायम राखली आहे. हलकी व्यावसायिक वाहने (एलसीव्ही) आणि जड व्यावसायिक वाहने (एचसीव्ही) देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक आणि शहरांतर्गत वाहतुकीत वृध्दी घडवून आणत आहेत. पायाभूत सुविधांची उभारणी, मालवाहतूक क्षेत्राचा विस्तार आणि वाहनांचा ताफा बदलण्याच्या प्रक्रियेतून वाहन खरेदीच्या मागणीला प्रोत्साहन देत श्रीराम फायनान्स वित्तपुरवठा क्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान आणखी बळकट करण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे.
एकट्या महाराष्ट्रासाठी श्रीराम फायनान्सचा सीव्हीसाठीचा वित्तपुरवठा पोर्टफोलिओ सप्टेंबर २०२५ अखेरीस तब्बल ११ हजार २०५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. बाजारपेठेत वित्तपुरवठ्याच्या मागणीत सातत्य असल्याची ठळक बाब या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. सीव्ही वाहनांसाठी कंपनीचा भारतभरातील एकूण वित्तपुरवठा अर्थात एयूएम याच कालावधीसाठी तब्बल एक लाख २८ हजार १४० कोटी रुपयांवर झेपावला आहे. व्यावसायिक वाहन खरेदीसाठीच्या कर्जपुरवठ्यात कंपनी अग्रभागी असल्याचे या आकडेवारीतून प्रतिबिंबित झाले आहे.
श्रीराम फायनान्सचे पॅन-इंडियासाठीच्या व्यावसायिक वाहन विभागाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुदर्शन होला बलनाड म्हणाले, “महाराष्ट्राचा भक्कम असा औद्योगिक पाया आणि राज्यात आकारास येत असलेल्या लॉजिस्टिक्स कॉरिडॉरमुळे व्यावसायिक वाहनांच्या मागणीत सातत्य आहे आणि सणासुदीच्या काळात मालवाहतुकीला आणखी पाठबळ मिळाले आहे. आमचे लक्ष फ्लीट ऑपरेटर्स आणि वाहतूक उद्योजकांना नानाविध वित्तपुरवठा पर्याय सादर करत त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम बनवण्यावर आहे. आमच्या या कृतीमुळे त्यांची कामकाजाची क्षमता वाढेलच, परंतु त्याचबरोबर त्यांना निर्धारित आणि किफायतशीर वाढीचे लक्ष्यही गाठता येईल.”
आगामी काळात श्रीराम फायनान्स महाराष्ट्रात ओईएम कंपन्या आणि वाहन डीलरबरोबर भागीदारी बळकट करत बाजारपेठेतील आपले अस्तित्व आणखी वाढविण्यावर भर देणार आहे. तसेच डिजिटल उपाययोजांच्या माध्यमातून झटपट आणि अधिक निरंतर कर्जपुरवठा उपलब्ध करण्यावरही कंपनीचा भर राहणार आहे. निम शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये अधिकाधिक भागांत पोहचणे, हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे छोट्या वाहनांच्या माध्यमातून मालवाहतूक करणाऱ्या असंख्य व्यावसायिकांना आणखी ताकद प्रदान करता येईल आणि राज्यभर वाहतूकीच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.
हेही वाचा : Turmeric Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! हळद दळून बदललं नशिब, प्रत्येक वर्षाची कमाई आहे ‘इतकी’
श्रीराम फायनान्स लिमिटेड
श्रीराम फायनान्स लिमिटेड ही श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी आहे जी ग्राहक वित्त, जीवन विमा, सामान्य विमा, स्टॉक ब्रोकिंग आणि वितरण व्यवसायांमध्ये लक्षणीय उपस्थिती ठेवते. श्रीराम फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल मालमत्ता वित्तपुरवठा करणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे (NBFC) ज्यांच्याकडे व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) रु. 2.81 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. 1979 मध्ये स्थापित, श्रीराम फायनान्स ही लघु रस्ते वाहतूक ऑपरेटर आणि लघु व्यवसाय मालकांच्या गरजा पूर्ण करणारी एक समग्र वित्त पुरवठादार आहे. पूर्व-मालकीच्या व्यावसायिक वाहने आणि दुचाकी वाहनांच्या संघटित वित्तपुरवठ्यात आघाडीवर आहे.
त्यांच्याकडे उभ्या एकात्मिक व्यवसाय मॉडेल आहे आणि ते प्रवासी व्यावसायिक वाहने, सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) कर्जे, ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे, सोने, वैयक्तिक कर्जे आणि कार्यरत भांडवल कर्जे इत्यादी अनेक उत्पादनांना आर्थिक पाठबळ देते. गेल्या 45 वर्षांत, त्यांनी कर्जाची उत्पत्ती, पूर्व-मालकीच्या व्यावसायिक वाहनांचे मूल्यांकन आणि इतर मालमत्ता आणि संग्रह या क्षेत्रात मजबूत क्षमता विकसित केल्या आहेत. कंपनीचे संपूर्ण भारतात अस्तित्व आहे, ३,२२५ शाखांचे नेटवर्क आहे आणि ७८,८३३ कर्मचारी आहेत जे ९६.६४ लाख ग्राहकांना सेवा देतात.