Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : “पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरण…”, काय आहे भूजल व्यवस्थापन?

भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 01, 2026 | 05:24 PM
"पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरण...", काय आहे भूजल व्यवस्थापन?

"पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरण...", काय आहे भूजल व्यवस्थापन?

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : केंद्रीय भूजल विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) डेटाबेसचा समन्वित व व्यापक वापर करून जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक करता येईल. गावपातळीवरील जलसुरक्षा आराखडे, पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. असे मत जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी व्यक्त केले आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण होणाऱ्या मौल्यवान माहिती भांडाराचा स्थानिक भूजल व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अधिकाधिक प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने एक अभिनव व आश्वासक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय भूजल विभागाच्या भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग” या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Union Budget2026: “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे…”; हर्षवर्धन सपकाळांची टीका

केंद्रीय भूजल विभागाचा तळागाळापर्यंत सखोल परिचय व्हावा, विभागातील भूजल वैज्ञानिकांचे कार्य व त्याचे महत्त्व सर्व संबंधित विभागांना समजावे, या हेतूने आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना प्रमुख पाहुणे होते.

डॉ. घोष यांनी भूजलविषयक अद्ययावत व विश्वासार्ह डेटा उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करत, अंतिम वापरकर्ते व विविध अंमलबजावणी यंत्रणांनी या माहितीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. विशेषतः ग्रामस्तरीय जलसुरक्षा योजना तयार करताना या संसाधनांचा सक्रिय वापर करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

या कार्यशाळेत डॉ. उपेंद्र धोंडे, पुणे केंद्रीय भूजल विभागाच्या वरिष्ठ भूजल वैज्ञानिकांनी “केंद्रीय भूजल विभागांतर्गत निर्माण माहिती व संसाधनांचा प्रसार आणि उपयोग” या विषयावर तांत्रिक सादरीकरण केले. त्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी राष्ट्रीय एक्विफर मॅपिंगचे (एनएक्यूयुआयएम) निष्कर्ष मांडून सीजीडब्ल्यूबी डेटा पोर्टल, आयएनजीआरईएस आणि डब्ल्यूआरआयएस या प्रणालींचा वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियोजन व निर्णय प्रक्रिया अधिक शास्त्रीय कशी होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा या कॉफी टेबल पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व ते सहभागी अधिकारी व प्रतिनिधींना वितरित करण्यात आले. केंद्रीय भूजल विभागाच्या विविध उपक्रम आणि राष्ट्रीय जलधर नकाशाकरण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती असलेली पुस्तिकाही वितरित करण्यात आली. या कार्यशाळेला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण, जलसंधारण विभाग (डब्ल्यूसीडी), लघु सिंचन, वन, कृषी विभाग व अन्य संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

ही कार्यशाळा सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असून, पुढील टप्प्यात ती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा मानस असल्याचे केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमामुळे केंद्रीय भूजल विभागाच्या कामाची व उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचून जलसंवर्धन आणि शाश्वत जलव्यवस्थापनासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Web Title: Coordination of all agencies is necessary for groundwater management district collector pujar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Water Issue

संबंधित बातम्या

Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई
1

Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण
2

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

ZP Election 2026 : अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात
3

ZP Election 2026 : अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

ब्र्हम्हा गावात ९ फेब्रुवारीला होणार दारूबंदीवर निवडणूक; मद्यविक्रीचा फैसला निर्णय असणार महिलांच्या हाती
4

ब्र्हम्हा गावात ९ फेब्रुवारीला होणार दारूबंदीवर निवडणूक; मद्यविक्रीचा फैसला निर्णय असणार महिलांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.