एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम (फोटो-सोशल मिडिया)
Advanced Cancer Treatment: कॅन्सर केअर अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएल)ने टाटा मेमोरिअल सेंटरचा भाग अॅडवान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीईआरसी) सोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत नवी मुंबईमधील खारघर येथील त्यांच्या प्रोटोन थेरपी सेंटरमध्ये एसडीएक्स®️ व्हॉल्यूण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम इन्स्टॉल करण्यात येईल. श्री. सूजर राजाप्पन तसेच श्री. मुरलीधरन एस. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे प्रगत तंत्रज्ञान डॉक्टरांना अचूक रेडिएशन थेरपी देण्यास, तसेच रूग्णांना उपचारदरम्यान त्यांचा श्वास रोखून धरण्याकरिता मार्गदर्शन करण्यास मदत करेल, जे विशेषत: फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यावरील उपचारासाठी महत्त्वाचे आहे, जेथे श्वासोच्छवासामुळे ट्यूमर्स स्थानांतरित होऊ शकतात. एसडीएक्स®️ सिस्टम फक्त ट्यूमरवर रेडिएशन जाण्याची खात्री देते, ज्यामुळे आरोग्यदायी अवयवांचे संरक्षण होते आणि उपचार निष्पत्ती वाढते.
हेही वाचा : India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर
ही सिस्टम का महत्त्वाची आहे?
एसीटीआरईसीचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, ”एसडीएक्स®️ व्हॉल्युण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम एसीटीआरईसीच्या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत असलेले एकमेव तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे मोशन-सेन्सिटिव्ह कर्करोगांवर सुरक्षितपणे व प्रभावीपणे उपचार करण्यासाठी महत्त्वाचे आहे. टीएमसीच्या वतीने मी हे सामाजिक कार्य ओळखण्यासह त्याप्रती योगदान देण्यासाठी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे आभार व्यक्त करतो. एसडीएक्स®️ व्हॉल्युण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम स्मार्ट ब्रेद-होल्डिंग कोच सारखी आहे, जी रूग्ण व डॉक्टरांना एकत्रित काम करत सुरक्षितपणे अत्यंत अचूक रेडिएशन थेरपी देण्यास मदत करते. हे लहान परिवर्तन कर्करोगावरील उपचारामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल.”
हा उपक्रम केएमपीएलच्या आरोग्यसेवेवरील फोकस क्षेत्रांतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलटी (सीएसआर) कटिबद्धतेचा भाग आहे. केएमपीएल दर्जेदार आरोग्यसेवा, तसेच पायाभूत सुविधेमधील अपग्रेड्स आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांना पाठिंबा देते.
”केएमपीएलमध्ये आमचा विश्वास आहे की, सर्वाधिक गरज असलेल्या व्यक्तींना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध असल्या पाहिजेत. टाटा मेमोरिअल सेंटरसोबत या सहयोगाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या एसीटीआरईसीला प्रत्येक रूग्णाला जागतिक दर्जावर प्रशंसित त्यांच्या कॅन्सर केअर सेवा देण्यामध्ये साह्य करण्याचा अभिमान वाटतो,” असे कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शाहरूख तोडीवाला म्हणाले.






