Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

२४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट ४८ सीयू यांचा समावेश होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 01, 2026 | 05:58 PM
धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

Follow Us
Follow Us:

धाराशिव: शनिवारी (३१ जानेवारी) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) तालुक्यातील एकूण २४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट (सीयू) व २७४ बॅलट युनिट (बीयू) तसेच राखीव ४८ बीयू व ४८ सीयू यांचा समावेश होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या.

या कामासाठी एकूण १२४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, शिक्षण विभागातील कर्मचारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच आयटीआयचे मास्टर ट्रेनर यांचा समावेश होता. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रक्रियेवर नियंत्रण अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी ओमकार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मृणाल जाधव, निवडणूक नायब तहसीलदार घृष्णेश्वर स्वामी आणि निवासी नायब तहसीलदार महादेव शिंदे उपस्थित होते.

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी शिक्षकांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली असून, माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दुःखातूनही प्रचाराचे कर्तव्य; मल्हार पाटील यांचे भावनिक वक्तव्य

“आपल्या कुटुंबातील मार्गदर्शक आणि राज्याचे लाडके नेते अजितदादा म्हणजे माझे आजोबा. त्यांच्या निधनाच्या दुःखातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कुटुंबातीलच कार्यकर्ते लढवत असल्याने, दुःख बाजूला ठेवून प्रचाराचे कर्तव्य पार पाडत आहे,” अशा भावना मल्हार पाटील यांनी एका प्रचारसभेत व्यक्त केल्या.

खामसवाडी येथे आयोजित सभेत त्यांनी जिल्हा परिषद गटातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विश्वास कोकणे तसेच पंचायत समितीचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी मतदारांना संबोधित केले.

देशात व राज्यात महायुतीचे सरकार असून, या सरकारच्या माध्यमातून खामसवाडी गटातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेता येईल. जिल्हा परिषदेतून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी या गटातील प्रतिनिधी मुख्यमंत्री तसेच आमदार राणा पाटील यांच्या विचारांचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“समाजातील तळागाळातील लोकांच्या अडचणी समजून घेणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद असलेले उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार विश्वास कोकणे यांना मतदान करून, तुमच्यातील एक सहकारी राणादादांच्या सोबतीला पाठवा. त्यामुळे विकासकामांसाठी कुठेही अडचण येणार नाही,” असे आवाहन मल्हार पाटील यांनी केले. सभेला खामसवाडी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Web Title: Commissioning and sealing process of evm machines completed for 247 polling stations in dharashiv taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Dharashiv
  • EVM
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.