
LenDenClub ची 'Lending Story' मोहिम लाँच (Photo Credit -X)
मुंबई, 31 ऑक्टोबर 2025: भारतातील अग्रगण्य पीअर-टू-पीअर (P2P) लेण्डिंग प्लॅटफॉर्म लेनदेनक्लब (LenDenClub) ने आपली नवीन ब्रँड जाहिरात मोहीम ‘लेण्डिंग स्टोरी’ (Lending Story) लाँच केली आहे. या मोहिमेद्वारे प्लॅटफॉर्मवरील ‘दैनंदिन कमाई’ या खास वैशिष्ट्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना दिलेल्या कर्जातून नियमित रोख प्रवाहाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य अनुभवण्यास मदत करते.
या डिजिटल जाहिरातीत पती-पत्नीमधील एका हलक्या-फुलक्या संवादाचे चित्रण आहे. पत्नीच्या संशयाचा क्षण अखेरीस एका विनोदी शोधात बदलतो आणि एका सामान्य घरगुती दृश्याचा शेवट अनपेक्षित वळणावर होतो. पतीच्या आनंदाचे गुपित उघडकीस येते, ते म्हणजे तो लेनदेनक्लबच्या माध्यमातून दररोज पैसे कमवत असतो. डॉ. मनिष पनवार आणि हरप्रीत जटैल अभिनीत ही जाहिरात, दैनंदिन कमाईची सहजता आणि विश्वसनीयता प्रभावीपणे दर्शवते.
Mirae Asset चे दोन नवीन ETF बाजारात, एनर्जी आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणुकीची संधी!
या जाहिरात मोहिमेचा मुख्य आणि आकर्षक संदेश आहे. “बीवी का शक बढे ना बढे, आपका मुनाफा बढता ही रहेगा लेनदेनक्लब के साथ. बस डाऊनलोड करो और लेण्ड करो. डेअली कमाओ, डेअली मुस्कुराओ (पत्नीचा संशय वाढो वा न वाढो, तुमचा नफा लेनदेनक्लबसोबत वाढतच राहील. फक्त डाऊनलोड करा, कर्ज द्या आणि दररोज कमवा, दररोज हसत राहा).” हा संदेश आर्थिक शिस्तबद्धता आणि सतत आर्थिक वाढीमुळे मिळणाऱ्या दैनंदिन आत्मविश्वासाच्या संकल्पनेला अधिक दृढ करतो.
या मोहिमेबद्दल मत व्यक्त करताना, लेनदेनक्लबचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले: “आर्थिक स्वावलंबित्व हे आनंदाचे छोटे, पण अर्थपूर्ण क्षण आणू शकते, हे दाखवून देण्याची आमची इच्छा होती. आमच्या दैनंदिन कमाई ऑफरिंगमुळे वापरकर्त्यांना अधिक नियंत्रण आणि पारदर्शकतेसह कमावण्याची सुविधा मिळते. ‘लेण्डिंग स्टोरी’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक स्थिरतेचे दैनंदिन फायदे सादर करत आहोत.” ही जाहिरात ब्रँड अॅम्बेसेडर हार्दिक पांड्या असलेली ‘इन्व्हेस्ट लाइक हार्दिक’ आणि ‘हर दिन हो खास’ यांसारख्या पूर्वीच्या मोहिमांतील आर्थिक समावेशन आणि दैनंदिन गुंतवणुकीच्या संवादाला पुढे नेते.
Paytm ची मोठी घोषणा! पेटीएम मनीने मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी दर केला कमी