 
        
        Paytm ची मोठी घोषणा! पेटीएम मनीने मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी दर केला कमी
मुंबई : पेटीएम मनी या भारतातील अग्रगण्य वेल्थ-टेक प्लॅटफॉर्मने आज आपल्या ‘पे लेटर’ (मार्जिन ट्रेडिंग सुविधा) दरांमध्ये मोठा बदल जाहीर केला असून, यामुळे लिव्हरेज्ड ट्रेडिंग (कर्जावर आधारित व्यवहार) आता किरकोळ तसेच उच्च-निव्वळ-मूल्य असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अधिक परवडणारी आणि सुलभ होणार आहे. नवीन दररचना उद्योगातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ७.९९% वार्षिक दरापासून सुरू होत असून, मोठ्या पोर्टफोलिओसाठी विशेष सवलतीच्या श्रेण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुंतवणूकदार आता एमटीएफ (मार्जिन ट्रेडिंग सुविधा) अंतर्गत १ लाख रुपयापर्यंतच्या निधीसाठी ७.९९% वार्षिक दराने, १ लाख रुपये ते १ कोटी रुपये दरम्यानच्या निधीसाठी ९.९९% वार्षिक दराने आणि १ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीसाठी ८.९९% वार्षिक दराने सुविधा घेऊ शकतात. ही दररचना पूर्वीच्या श्रेणींपेक्षा मोठी कपात दर्शवते, जिथे १ लाख रुपये ते २५ लाख रुपये दरम्यानच्या निधीसाठी दर १४.९९% इतके उच्च व्याजदर होते. कमाल व्याजदर ९.९९% वार्षिक इतका निश्चित करून पेटीएम मनीने लिव्हरेजचा खर्च एकतृतीयांशाहून अधिकाने कमी केला आहे, ज्यामुळे ट्रेडर्सना त्यांच्या नफ्याचा अधिक मोठा वाटा राखता येईल.
मोठ्या पोर्टफोलिओसाठी सवलतीच्या श्रेण्या रणनीतिक लाभ देतात. २५ लाख रुपये ते १ कोटी रुपये दरम्यान निधी असलेल्या उच्च-निव्वळ-मूल्य (एचएनआय) गुंतवणूकदारांसाठी आता वहन खर्च कमाल ९.९९% वार्षिक इतका मर्यादित राहील, ज्यामुळे त्यांना अधिक चांगला निव्वळ परतावा मिळेल. तर १ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी असलेल्या अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ गुंतवणूकदारांना ८.९९% वार्षिक या विशेष दराचा लाभ मिळेल, जो भारतीय बाजारपेठेत परवड आणि कार्यक्षमतेचा नवा मापदंड ठरेल.
१,००,००० रुपये इतक्या निधीवर ७.९९% वार्षिक व्याज दराने व्याज केवळ ७,९९० रुपये इतके येते, जे सध्या उद्योगात प्रचलित दरांपेक्षा सुमारे ४५% कमी आहे. पेटीएम मनीच्या कमी केलेल्या एमटीएफ दरांमुळे गुंतवणूकदार आता अधिक आत्मविश्वासाने आणि परवडणाऱ्या खर्चात व्यवहार करू शकतील.
पेटीएम मनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “७.९९% वार्षिक दरापासून सुरू होणारे एमटीएफ दर आणि उच्च निधीसाठीच्या सवलतीच्या श्रेण्यांमुळे आम्ही ट्रेडिंग पूर्वीपेक्षा अधिक परवडणारे आणि सुलभ बनवत आहोत. आमचे उद्दिष्ट ट्रेडर्सना त्यांचा अधिक नफा टिकवून ठेवण्यास मदत करणे आहे. तसेच आमच्या जलद ऑर्डर-पॅड आणि एमटीएफ कॅलक्युलेटरच्या सहाय्याने नियोजन सुलभ करून अधिक बुद्धिमान आणि माहितीआधारित ट्रेडिंग निर्णय घेण्यास सक्षम बनवणे आहे.”
या उपक्रमाद्वारे पेटीएम मनीने सर्व गुंतवणूकदार वर्गांसाठी पारदर्शक आणि किफायतशीर उपायांद्वारे संपत्ती निर्मितीचे लोकशाहीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. गुंतवणूक अधिक परवडणारी करून, कंपनीने भारतातील विश्वासार्ह वेल्थ-टेक प्लॅटफॉर्म म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत केली आहे.






