Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅग्मा एचडीआय तर्फे ‘डबल सुरक्षा’ योजनेचा शुभारंभ, प्रत्येक उत्पन्न गटासाठी परवडणारे विमा संरक्षण

Double Suraksha Scheme: विविध आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सने ‘डबल सुरक्षा’ हा बहुमुखी विमा पर्याय सादर केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 18, 2024 | 12:14 PM
'डबल सुरक्षा' योजना काय आहे

'डबल सुरक्षा' योजना काय आहे

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: अधिक खर्चामुळे सर्वसमावेशक आरोग्य योजना परवडत नसलेल्या व्यक्ती अथवा रुग्णालयामध्ये भरतीदरम्यान बेहिशेबी खर्चासाठी अतिरिक्त कव्हरेज शोधणाऱ्या श्रीमंत व्यक्तींसाठी ‘डबल सुरक्षा’ कवच स्थिर स्वरुपात दैनिक रोख लाभ प्रदान करते. ‘डबल सुरक्षा’ कवच पॉलिसीधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांच्या आधारे रुग्णालय उपचाराशी संबंधित वैद्यकीय किंवा गैर-वैद्यकीय खर्चाकरिता पेआउट वापरण्याची आर्थिक लवचिकता प्रदान करते.

ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याच्या उद्देशाने मॅग्मा एचडीआयने विस्तृत पातळीवर विविध शहरात केलेल्या गुणात्मक संशोधनरुपी अभ्यासातून हे सुरक्षा कवच प्रत्यक्षात आकारास आले आहे. संशोधनातून कंपनीला असे आढळले आहे की, रुग्णालयातील उपचारांमुळे वैद्यकीय खर्चात वाढ होत असते किंवा त्यात अनपेक्षित भरही पडत असते. समाजातील मध्यम उत्पन्न वर्गातील व्यक्तींचे उपचारावेळी नियमित कामकाज थांबल्याने त्यांच्या उत्पन्नालाही फटका बसतो. सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेच्या तुलनेत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विमा पेआउट वापरण्याची लवचिकता देणाऱ्या कमी खर्चाच्या विमा पर्यायाची तीव्र गरज असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. 

कशी आहे योजना 

नव्या योजनेबाबत भाष्य करताना मॅग्मा एचडीआयचे आरोग्य आणि अपघात विभागाचे प्रमुख अमित सिरसीकर म्हणाले, “ ग्राहकांना वास्तविक जीवनात भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देता यावे, यासाठी ‘डबल सुरक्षा’ योजना तयार करण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीकडे आधीपासून सर्वसमावेशक आरोग्य विमा कवच आहे किंवा नाही यानुसार ‘ ‘डबल सुरक्षा’ योजना प्रत्येकासाठी प्रासंगिकतेनुसार वेगवेगळी असू शकते.

हेदेखील वाचा – भारताचा विकास दर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक चांगलाः वर्ल्ड बँक चीफ अजय बंगा

‘डबल सुरक्षा’ कवच 

अनेकदा असेही आढळून आले आहे की, आरोग्य विमा कवच असलेल्यांना देखील अनपेक्षित खर्चांचा सामना करावा लागतो. बहुतेक आरोग्य पॉलिसींमध्ये समाविष्ट नसलेल्या उपभोग्य वस्तूंचा करावा लागणारा वापर किंवा रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णासोबत राहणाऱ्या सहकारी व्यक्तीचा प्रवास आणि भोजनाचा खर्च यासारख्या अनपेक्षित खर्चाला तोंड द्यावे लागते.  जेव्हा उपचारासाठी अन्य शहरात जाणे आवश्यक असते, तेव्हा सहकारी व्यक्तीच्या राहण्याच्या खर्चाची भर पडून हे खर्च आणखी वाढतात. पॉलिसीधारकांना आर्थिक सहाय्य प्रदान करत या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी ‘डबल सुरक्षा’ कवच आवश्यक ती पावले उचलते.

महत्त्वाचा आधार

सर्वसमावेशक आरोग्य योजना परवडत नसलेल्या ट्रक ड्रायव्हर्स किंवा घरगुती कामगारांसारख्या  व्यक्तींना ही योजना महत्त्वाचा आधार देते. या योजनेआधारे ते वैद्यकीय खर्च पेलू शकतात आणि उपचारासाठी रुग्णालयात भरती असताना होणाऱ्या उत्पन्न नुकसानीपासून स्वत:चे संरक्षण देखील करू शकतात. ही योजना खऱ्या अर्थाने आपल्या वचनाला मूर्त रूप देते: चलती रहे जिंदगी, रुकावटों पे रुके नहीं याचाच अर्थ कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता जीवन पुढे सरकत राहते, याची खात्री ही योजना करते.”

हेदेखील वाचा – PM Kisan Nidhi: या 5 कारणांमुळे अजूनही बँक अकाउंटमध्ये 18’वा हप्ता जमा झाला नाही, यावर उपाय काय? जाणून घ्या

दुहेरी लाभ

‘डबल सुरक्षा’ हे नाव दोन कठीण परिस्थितींमध्ये दुहेरी दैनिक रोख लाभाचे प्रतिनिधित्व करते. आयसीयू रुग्णालय उपचार आणि अपघातामुळे होणारे रुग्णालय उपचार. ‘डबल सुरक्षा’ अनेक पूरक आणि वैकल्पिक कवच प्रदान करते. त्याआधारे पॉलिसीधारकांना आपल्या  वैयक्तिक गरजांनुसार स्वत:साठी विमा कवच तयार करता येते. ग्राहकाच्या गरजेनुसार निश्चित करता येणारी विम्याची रक्कम आणि पॉलिसीसाठी लवचिक कालावधीसह ही योजना विविध आर्थिक परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

मुख्य अतिरिक्त सुविधांमध्ये समाविष्ट घटक:

  • अनुकंपा लाभ: एखाद्या विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास, विमाधारक व्यक्ती किंवा नामांकित व्यक्तीला एकरकमी रक्कम मिळेल
  • निरोगीपणा लाभ: आजारपणामुळे किंवा दुखापतीमुळे सलग किमान 5 दिवस रुग्णालयात दाखल केल्यास, विमाधारक व्यक्तीला अतिरिक्त एकरकमी रक्कम मिळते
  • डे केअर ट्रीटमेंट कॅश बेनिफिट: जर विमाधारकाला वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक उपचारांची (मोतीबिंदू, हेमोडायलिसिस इ) गरज असल्यास आणि त्याचा लाभ घेतल्यास त्यांना एकरकमी लाभाची रक्कम मिळेल आणि ती आजारपणाच्या दैनंदिन रोख लाभाच्या 2 पट आहे

Web Title: Magma hdi launches double suraksha scheme affordable insurance cover for every income group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
1

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
2

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?
3

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?
4

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.