वर्ल्ड बँक अध्यक्ष अजय बंगा (फोटो सौजन्य - वर्ल्ड बँक)
भारताच्या विकास दराने शहरी विकास आणि शाश्वततेमध्ये जागतिक बँकेच्या प्रकल्पांसह, जीवनाचा दर्जा सुधारण्यावर आणि महिला कर्मचा-यांचा सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी म्हटले आहे. भारताचा विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेचा सर्वात तेजस्वी भाग आहे आणि त्याचा बराचसा भाग देशांतर्गत बाजारावर चालतो असेही त्यांनी म्हटले आहे.
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी बंगा यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी सांगितले की, “भारताचा विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात तेजस्वी भागांपैकी एक आहे यात शंका नाही. मला असे वाटते की अशा वातावरणात 6-7% आणि त्याहून अधिक वाढ करणे हे दर्शविते की त्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे” असं म्हणत त्यांनी कौतुकही केले.
भारतातील स्थिती
या वाढीचा मोठा भाग भारतामध्ये आहे, जो देशांतर्गत बाजारपेठेद्वारेदेखील चालवला जातो, जे काही मार्गांनी योग्य आणि उत्तम संकेत देत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे भारताला ज्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, ती म्हणजे जीवनाची गुणवत्ता. ज्याप्रमाणे माणसाला हवा आणि पाण्याची गरज भासते त्याप्रमाणेच ही गोष्ट आहे आणि तशीच गुणवत्ता राखून ठेवली आहे.
चांगल्या परिणामांची अपेक्षा
आम्ही त्यांच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सक्रियपणे गुंतलो आहोत आणि मला वाटते की येत्या काही महिन्यांत आम्हाला प्रकल्पांच्या बाबतीत आणखी चांगले परिणाम दिसतील,” असे पत्रकार परिषदेत बंगा एका प्रश्नाच्या उत्तर देत म्हणाले. जागतिक बँकेच्या संचालनाचे व्यवस्थापकीय संचालक अॅना बेजर्ड यांनी म्हटले की, बँक ही देशातील सरकारला वाढीचे रोजगार आणि शाश्वत विकास कसा व्हावा यासाठी संपूर्णतः मदत करत आहे. त्यामुळे भारतात याचे अधिक चांगले परिणाम होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शविलाय.
भारताची सक्षमता
भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची अफाट क्षमता असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. जागतिक बँक भारतासोबत शहरी विकासावरही काम करत आहे, कारण हवेची गुणवत्ता, पाणीपुरवठा किंवा शहरी नियोजन असो शहरांना अधिक राहण्यायोग्य बनवण्याची अफाट क्षमता आहे. त्यामुळे यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढतोय आणि तो अधिक वाढू शकतो असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय.






