Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक! McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज; नेमकं प्रकरण काय?

McDonald Intern News : मॅक्डोनाल्ड्स इंडियामध्ये काम करणाऱ्या एका इंटर्नचा पगार रोखला आणि त्याने तो मिळवण्यासाठी अशी शक्कल लढवली बॉसला त्याचा पगार द्यावा लागला. McDonald बाकी गोष्टींना सामोरं जावं लागलं ते वेगळं. आजची रविवारची सकाळ McDonald India साठी एका दुःखभऱ्या स्वप्नासारखी होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 12:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक!
  • McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज
  • नेमकं प्रकरण काय?
McDonald Intern News : कामाच्या ठिकाणी आपले हक्क मिळाले नाहीत तर आपण काय करतो? तक्रार करतो नंतर त्याची दखल घेतली जाते आणि नंतर त्यानुसार कारवाई झाली तर तुमचा मुद्दा समोर येतो आणि त्याकडे लक्ष्य दिलं जातं. पण Gen Z चा फंडाच वेगळा आहे. याचा आताच अनुभव McDonald च्या प्रकरणात आला. कामाच्या मोबदला हक्काचा पगार वेळेवर देत नाही म्हणून एक इंटर्न तरुणाने थेट बॉसलाच हटके स्टाईलमध्ये धडा शिकवला. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात. ( McDonald Intern News ) 

ज्याची भीती होती तेच घडलं… Crude Oil चा भडका,100 डॉलरच्या उंबरठ्यावर दर; आता Petrol – Diesel चे भाव…

मॅक्डोनाल्ड्स इंडियामध्ये काम करणाऱ्या एका इंटर्नचा पगार रोखला आणि त्याने तो मिळवण्यासाठी अशी शक्कल लढवली बॉसला त्याचा पगार द्यावा लागला. McDonald बाकी गोष्टींना सामोरं जावं लागलं ते वेगळं. आजची रविवारची सकाळ McDonald India साठी एका दुःखभऱ्या स्वप्नासारखी होती. लोक अंथरुणात चहा पीत असताना, McDonald मात्र त्यांच्या अडचणी सोडवण्यात व्यस्त होतं.

एका इंटर्नने अकाऊंट केलं हॅक

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे खाते कोणत्या मोठ्या हॅकर्सनी नाही तर कंपनीत काम करणाऱ्या एका इंटर्नने हॅक केले होते. यानंतर, त्याने एकापाठोपाठ एक अनेक पोस्ट केल्या. त्या इंटर्नने आपला बॉस अमित जोशी यांचे नावही लिहिले आणि त्यांच्यावर आरोप केले. या पोस्टनंतर, त्या इंटर्नने ज्या प्रकारे आपले विचार मांडले आहेत, त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ही पोस्ट चीनसह अनेक देशांमध्ये पोहोचली. नंतर, त्या इंटर्नने सांगितले की त्याला त्याचा पगार मिळाला आहे.

इंटर्नचा दावा काय?

त्या अकाऊंटवरील पहिल्या पोस्टमध्ये, व्यक्तीने स्वतःची ओळख McDonald’s India तील इंटर्न म्हणून सांगतो. त्याने दावा केला की, त्याचा बॉस, अमित जोशी, याने त्याला अनेक महिन्यांपासून पगार दिला नव्हता, ज्यामुळे त्याला दोन अतिरिक्त कामे करण्यास भाग पडले. त्या पोस्टमध्ये, त्याने दावा केला की तो मॅकडोनाल्ड्स एशियाची अनेक खाती सांभाळतो, परंतु त्याला डिसेंबर २०२५ पासून पगार मिळालेला नाही.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, त्याने सांगितले की तो कस्टमर सपोर्ट आणि डिलिव्हरी अशा दोन नोकऱ्या करतो. त्याने मीमकॉइनमध्ये पैसे गमावले आणि त्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे स्पष्ट केलं.

₹६०,००० पेक्षा जास्त मदतीसाठी दावा

दुसऱ्या एका पोस्टमध्ये, कथित इंटर्नने आपला पगार न मिळाल्याबद्दलची तक्रार पुन्हा एकदा सांगितली. त्याने लिहिले की तो कम्युनिटीकडून मदत घेण्याचा विचार करत आहे आणि दावा केला की कम्युनिटीकडे ₹६०,००० पेक्षा जास्त रक्कम आहे. त्याने असेही सांगितले की त्याला मे महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत.

पैसे मिळाले

पगारावर चर्चा केल्यानंतर आणि तिच्या बॉसचे नाव उघड केल्यानंतर, त्या इंटर्नने आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने म्हटले होते की त्याला पगार मिळाला आहे. आणखी एका पोस्ट करत त्याने स्वतःची ओळख कबीर शर्मा म्हणून दिली. या पोस्टमध्ये,त्याने $3,000 पेक्षा जास्त (अंदाजे २.८३ लाख रुपये)रक्कम मिळाली असल्याचं स्पष्ट केलं.

कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण

अकाउंट हॅकिंगच्या या प्रकरणानंतर लगेचच, पूर्वीच्या हँडलवरून सर्व वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्यात आले असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या प्रकरणावर मॅकडोनाल्ड्स इंडियाने स्पष्ट केलंय की, ‘सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका पोस्टशी मॅकडोनाल्ड्स इंडियाचा कोणताही संबंध नाही. त्यामध्ये आमच्या ब्रँडच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे आणि ती पोस्ट आमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून कधीही करण्यात आलेली नाही. त्या प्रतिमेमध्ये स्पष्ट विसंगती आढळतात, ज्यावरून हे स्पष्ट होते की ही सामग्री पूर्णपणे बनावट आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, या पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पसरवू नका’.

Layoffs News : बातमीमुळे खळबळ… Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! तब्बल ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात

Web Title: Mcdonald india gen z intern exposes boss online recovers salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Cyber security
  • Gen Z
  • McDonald

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.