Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Jejurigad Dasara Melava: जेजुरीगडचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत सामाजिक ऐक्य, महाराष्ट्राची अस्मिता आणि आधुनिक, सक्षम समाजनिर्मितीचा विचारही या दशकपूर्ती सोहळ्यात मांडण्यात येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 16, 2026 | 04:08 PM
Jejuri, Jejurigad Dasara Melava, Navnath Padalkar, Baramati

Jejuri, Jejurigad Dasara Melava, Navnath Padalkar, Baramati

Follow Us
Follow Us:
  • जेजुरीगड दसरा मेळाव्याचे १० वे वर्ष (दशकपूर्ती सोहळा) १८ ऑक्टोबरला जेजुरीत
  • निरा रोडवरील मल्हार नाट्यगृहात दुपारी १२ वाजता सोहळ्याचे आयोजन
  • जेन झी चे भविष्य, सामाजिक न्याय आणि विकसित महाराष्ट्र’ ही यंदाची मुख्य संकल्पना
Baramati News: युवकांचे भविष्य, सामाजिक न्याय आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना केंद्रस्थानी ठेवत जेजुरीगड दसरा मेळाव्याचा दशकपूर्ती विशेष सोहळा रविवारी (दि. १८) जेजुरीत आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीसमोरील आव्हाने, शिक्षण-रोजगाराच्या संधी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीवर या मेळाव्यात भर दिला जाणार आहे.

जेजुरीगड दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता निरा रोडवरील मल्हार नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे. संस्थापक अध्यक्ष  नवनाथ पडळकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याचे यंदा दहावे वर्ष आहे.

Supreme Court : संजय राऊत आणि निखिल वागळेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अवमानना नोटीस जारी

नव्या पिढीच्या प्रश्नांना व्यासपीठ

‘ जेन झी चे भविष्य, सामाजिक न्याय आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प!’ ही यंदाच्या मेळाव्याची प्रमुख संकल्पना आहे. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून तरुणांना उपलब्ध होणाऱ्या संधींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बदलत्या काळात युवकांना सक्षम बनविणे, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे.

शेतकरी प्रश्नांपासून सामाजिक न्यायापर्यंत

युवकांच्या भविष्याशी निगडित शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, पाणी व्यवस्थापन, आरक्षण, वंचित घटकांना समान संधी आणि ग्रामीण विकास या महत्त्वाच्या विषयांवरही मेळाव्यात भर दिला जाणार आहे. सामाजिक न्यायाची भूमिका अधिक व्यापक करताना ग्रामीण भागातील तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि प्रगतीच्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली जाणार आहे.

जेजुरीगडचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत सामाजिक ऐक्य, महाराष्ट्राची अस्मिता आणि आधुनिक, सक्षम समाजनिर्मितीचा विचारही या दशकपूर्ती सोहळ्यात मांडण्यात येणार आहे.

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

कर्तृत्ववानांचा होणार गौरव

दहा वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच धर्म-संस्कृती आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. पुढील दशकात युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला जाणार आहे.या मेळाव्यास युवक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, शेतकरी, उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जेजुरीगड दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Baramati jejurigad dasara melava decennial celebration on october 18 at jejuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • baramati
  • Gen Z
  • Maharashtra Politics
  • pune news

संबंधित बातम्या

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
1

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
2

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के
3

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.