Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metaचे आर्थिक निकाल जाहीर, अपेक्षित यश नाही; तरी AI वर अब्जावधींची गुंतवणूक कायम

Meta: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने ताजे तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले. जाहिरातींमधील मजबूत उत्पन्नामुळे महसुलात चांगली वाढ झाली असली, तरी AI क्षेत्रातील मोठी गुंतवणूक, न्यायालयीन खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या भरपाईमुळे कंपनीचा नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 02:48 PM
Metaचे आर्थिक निकाल जाहीर(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Metaचे आर्थिक निकाल जाहीर(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मेटाच्या महसुलात वाढ झाली, मात्र नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिला.
  • AI प्रकल्पांवरील मोठ्या गुंतवणुकीमुळे खर्चात लक्षणीय वाढ झाली.
  • फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील जाहिरात महसूल कंपनीची प्रमुख ताकद ठरला.
  • निकालानंतर मेटाच्या शेअरमध्ये घसरण झाली आणि गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली.
 

फेसबुक Facebook, इन्स्टाग्राम Instgramआणि व्हॉट्सअॅपची Whatapp मालकी असलेल्या मेटा कंपनीने ताजे तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या निकालात कंपनीच्या उपन्नात चांगली वाढ झाली असली तर, नाफ्यात अपेक्षेपेक्षा मोठी घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूदारांमध्ये निराशा पाहायल मिळत आहे. सांगायलचं झालं तर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील मोठी गुंतवणूक, न्यायालयीन प्रकरणांवरील खर्च आणि कर्मचाऱ्यांना दिलेली भरपाई यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला.

कंपनीची सर्वात मोठी ताकद

ताज्या तिमाहीत मेटाच्या एकूण महसुलात मोठी वाढ झाली. जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न अजूनही कंपनीची सर्वात मोठी ताकद ठरत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील जाहिरात व्यवसाय मजबूत राहिल्याने महसूल बाजाराच्या अंदाजापेक्षा अधिक राहिला. मात्र, वाढत्या खर्चामुळे निव्वळ नफा कमी झाला. (Meta)

मेटाच्या शेअरमध्ये मोठी घसरण

निकाल जाहीर होताच शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. नियमित व्यवहार संपल्यानंतरच्या सत्रात मेटाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. विश्लेषकांच्या मते, AI प्रकल्पांवर कंपनी करत असलेल्या प्रचंड खर्चाबाबत गुंतवणूकदारांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. भविष्यात या गुंतवणुकीचा किती फायदा होईल की नाही असा प्रश्न सध्या निर्माण असल्याने बाजार अजूनही सावध भूमिका घेत आहे.

न्यायालयीन प्रकरणांचा मोठा वाटा

कंपनीच्या खर्चामध्ये न्यायालयीन प्रकरणांचा मोठा वाटा आहे. विविध देशांमध्ये मेटाविरोधात अनेक कायदेशीर व नियामक प्रकरणे सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये कंपनीला मोठी नुकसानभरपाईही द्यावी लागली आहे. याशिवाय, यावर्षी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे सेवामुक्त कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपाईचाही आर्थिक परिणाम कंपनीवर झाला.

Share Market News: नफा वाढला, तरी अदानींच्या शेअर्सना मोठा फटका! कारण काय?

भविष्यात नवीन कमाईचे मार्गही खुले

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी मात्र AI क्षेत्राबाबत सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ही केवळ कंपनीच्या विद्यमान व्यवसायाला बळ देणार नाही, तर भविष्यात नवीन कमाईचे मार्गही खुली करेल. त्यामुळे डेटा सेंटर, अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आणि AI चिप्सवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरूच ठेवण्याचा कंपनीचा निर्णय आहे.

याचबरोबर मेटा भविष्यात क्लाउड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रातही उतरू शकते. कंपनीकडे असलेली प्रचंड संगणकीय क्षमता इतर कंपन्यांना भाड्याने देण्याचा पर्यायही मेटा तपासत आहे. हा व्यवसाय सुरू झाल्यास जाहिरातींशिवाय कंपनीसाठी आणखी एक मोठा उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मुलांवर होणाऱ्या परिणाम

मात्र, कंपनीसमोर काही मोठी आव्हानेही आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबाबत अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे आणि वाढती सरकारी तपासणी मेटासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे AI मधील प्रगतीबरोबरच कंपनीला विश्वासार्हता टिकवण्याचेही आव्हान आहे.

AI आधारित स्मार्ट चष्मे

दरम्यान, मेटाचा व्हर्च्युअल रिअॅलिटी व्यवसाय अजूनही तोट्यात आहे. या विभागात मोठी गुंतवणूक करूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आता कंपनीचा भर AI आधारित स्मार्ट चष्मे आणि नव्या तंत्रज्ञान उत्पादनांवर वाढताना दिसत आहे.

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगात नव्या सूत्रामुळे वेतन भरघोस वाढीची शक्यता

नफ्यावर दबाव कायम

दरम्यान, मायक्रोसॉफ्टसारख्या प्रतिस्पर्धी कंपनीने याच काळात मजबूत आर्थिक निकाल सादर केले आहेत. क्लाउड सेवा आणि AI व्यवसायामुळे मायक्रोसॉफ्टने बाजाराच्या अपेक्षा ओलांडल्या. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, मेटाचा जाहिरात व्यवसाय अजूनही मजबूत असला तरी AI वर होत असलेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि वाढता खर्च यामुळे नफ्यावर दबाव कायम आहे. आता कंपनीची ही मोठी गुंतवणूक पुढील काही वर्षांत किती फायदेशीर ठरते, याकडे गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Meta misses profit expectations sticks to massive ai spending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Business News
  • Facebook
  • Meta AI

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!
1

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
2

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.