
Mirae Asset Life Cycle Fund 2056: (फोटो- सोशलमीडिया)
गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक नवीन पर्याय आला आहे. मिरे अॅसेट म्युच्युअल फंडने आपला नवीन फंड लाँच केला आहे. मिरे अॅसेट लाईफ सायकल फंड 2056 सगळ्यात जास्त काळासाठी फंड आहे.
पुढची 30 वर्षे तुम्ही यात पैसे गुंतवू केल्याने 2056 मध्ये हा फंड मॅच्युअर होणार आहे. याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फंड आपोआप रिस्क कमी करत जातो.
या फंडमध्ये ग्लाइड पाथ नावाची पद्धत आहे. सुरुवातीच्या 15 वर्षात तुमचा जास्त पैसा इक्विटीमध्ये राहणार. 65 ते 95 टक्के पैसा शेअर बाजारात राहील जेणेकरून ग्रोथ चांगली होईल. जसजसे 2056 जवळ येईल तसतसा फंड आपोआप तुमचा पैसा इक्विटी मधून काढून डेट आणि आर्बिट्राजमध्ये टाकेल. शेवटच्या 3 वर्षात फक्त 5 ते 25 टक्केच पैसा इक्विटीत राहील. रिस्क एकदम कमी होईल.सुरुवातीला लार्ज कॅप आणि मिड-स्मॉल कॅप 50-50 असणार, नंतर हळूहळू 80-20 असं लार्ज कॅप जास्त होणार. Mirae Asset Life Cycle Fund 2056:
या फंडचा NFO 28 सप्टेंबर 2026 ला सुरू झाला आहे आणि 12 ऑक्टोबर 2026 ला बंद होणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर पासून तुम्ही परत यात पैसे टाकू शकता.NFO मध्ये कमीत कमी 5000 रुपये टाकावे लागतील. पण SIP फक्त 99 रुपयांपासून सुरू होते. हो, फक्त 99 रुपये महिन्याला.
त्यानंतर 1 रुपयाने वाढवू शकता.या फंडचा बेंचमार्क आहे निफ्टी 500 TRI 65 टक्के, निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट 25 टक्के, सोनं 7.5 टक्के आणि चांदी 2.5 टक्के हा मल्टी अॅसेट फंड आहे. इक्विटी, डेट, सोनं, चांदी, InvIT आणि आर्बिट्राज सगळीकडे पैसे लावले जाणार.या फंडला तीन मॅनेजर सांभाळणार आहेत. हर्षद बोरवाके इक्विटी बघतील, बसंत बाफना डेट बघतील आणि रितेश पटेल सोनं-चांदी बघतील.
Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं
मिरे अॅसेटचे हेड वैभव शाह म्हणाले, “सेबीने लाईफ सायकल फंड ही नवीन कॅटेगरी आणली त्याचं आम्ही स्वागत करतो. यामुळे लोकांना आपलं ध्येय ठरवून गुंतवणूक करता येईल. आम्ही 2056 हे वर्ष निवडलं कारण पुढच्या 30 वर्षात माणसाच्या आयुष्यात सगळ्या मोठ्या गोष्टी होतात. मुलाचं शिक्षण, लग्न, घर घेणं आणि शेवटी निवृत्ती. हा फंड या सगळ्या गोष्टींसाठी मदत करेल. तुम्ही SIP ने पैसे टाका आणि नंतर SWP ने काढा.”फंड मॅनेजर हर्षद बोरवाके म्हणाले, “सुरुवातीच्या काळात इक्विटीच ग्रोथचं इंजिन असतं. जास्त वेळ असेल तर चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो. आम्ही योग्य किंमत आणि व्हॅल्यूएशन बघून इक्विटी निवडू.”
लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
जर तुम्ही एका वर्षाच्या आत पैसे काढले तर 3 टक्के एक्झिट लोड लागेल. एक ते दोन वर्षात काढले तर 2 टक्के आणि दोन ते तीन वर्षात 1 टक्के. तीन वर्षानंतर पैसे काढले तर कोणताही चार्ज नाही.ज्यांना लांब पल्ल्यासाठी, 30 वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे आणि दर महिन्याला थोडे थोडे पैसे टाकायचे आहेत त्यांच्यासाठी हा फंड चांगला पर्याय आहे.