Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परिस्थिती गंभीर! Modi चं आवाहन, Trump चा निर्णय, कच्च्या तेलाच्या किमती करणार मार्केटवर तिहेरी परिणाम? आता…

. ब्रेंट क्रूडच्या किमतीही वाढून प्रति बॅरल १०५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या घडामोडीचा परिणाम जागतिक बाजारपेठा आणि भारतीय बाजारपेठ या दोन्हींवर होणार आहे. परिणामी जागतिक स्तरावर महागाईचा भडका उडणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 11, 2026 | 05:58 PM
(फोटो सौजन्य:chatgpt)

(फोटो सौजन्य:chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • जागतिक स्तरावर महागाईचा भडका
  • अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव
  • जागतिक स्तरावर मार्केटचे हाल
Modi Appeal Trump Decision Impact : सोमवारी शेअर बाजारावर अनेक प्रमुख घटकांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सध्यापुरते घरून काम करण्याला प्राधान्य देण्याचे, वर्षभरासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास पुढे ढकलण्याचे आणि सोने खरेदी न करण्याचे आवाहन केली आहेत. पण त्याचा परिणामी, टायटन, सेन्को, कल्याण ज्वेलर्स आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ३.५% वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीही वाढून प्रति बॅरल १०५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या घडामोडीचा परिणाम जागतिक बाजारपेठा आणि भारतीय बाजारपेठ या दोन्हींवर होणार आहे. परिणामी जागतिक स्तरावर महागाईचा भडका उडणार आहे. त्यामुळे सामान्यांचं जगणं कठीण झालं आहे.

Cheapest Gold Price: स्वस्त सोन्यासाठी ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर! तुमच्या राज्याचाही यादीत समावेश आहे का? पाहा यादी

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव

माध्यमांच्या वृत्तांनुसार, इराणने अमेरिकेकडे सर्व निर्बंध उठवण्याची, तेल निर्यातीवरील मर्यादा संपुष्टात आणण्याची आणि अमेरिकन नौदलाने घातलेली नाकेबंदी हटवण्याची मागणी केली. पण या अटींची पूर्तता झाल्यास ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करण्यात आपण मदत करू, असेही इराणने स्पष्ट केले. पण आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आणि युरेनियमच्या साठ्यांबाबत अमेरिकेने केलेल्या मुख्य मागण्या मान्य करण्यास इराणने नकार दिला आहे. त्यामुळ सध्या तरी सगळंच अलबेल असलेलं पाहायला मिळत आहे. या सगळ्याचा जागतिक स्तरावर नेमका काय परिणाम होणार या सर्व परिस्थितीमुळे भितीचं वातावरण आहे.

आशियाई मार्केटचे हाल

या सगळ्यात बेंजामिन नेतन्याहू यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण ठरतं. ते म्हणाले की, इराणसोबतचा संघर्ष अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही आणि त्यांच्या अणु-स्थळांचा खातमा करण्याचे कार्य अद्याप बाकी आहे. या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, आशियाई बाजारांमध्ये संमिश्र स्वरूपाचा व्यवहार दिसून आला. ‘हँग सेंग’ निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी घसरून २६,३१० अंकांवर व्यवहार करत होता, तर ‘शांघाय’ निर्देशांकात किंचित मंदी दिसून आली आणि तो ४,१७९ अंकांवर व्यवहार करत होता. ‘निक्केई’ निर्देशांक ०.२१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर ‘कोस्पी’ निर्देशांकाने ४.४१ टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवत क्लोज झाला.

अमेरिकन बाजार स्थिर

अमेरिकन बाजारांमधील व्यवहारही बऱ्याच अंशी स्थिर राहिले आहेत. Dow Jones किरकोळ वाढीसह बंद झाला, तर ‘S&P 500’ आणि ‘Nasdaq मध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. या जागतिक संकेतांचा प्रभाव पडल्यामुळे, ‘GIFT Nifty’ सध्या २४,०५५ च्या पातळीवर व्यवहार करत असून, त्यात १७९ अंशांची घसरण झाली आहे.
शुक्रवारी ‘Nifty’ घसरणीसह बंद झाला होता; जर आज ही कमकुवत स्थिती कायम राहिली, तर २४,००० आणि त्यानंतर २३,८०० या पातळ्या महत्त्वाचे support क्षेत्र म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे. याउलट, २४,३०० ते २४,५०० या पातळ्यांच्या दरम्यान एक मजबूत अडथळा क्षेत्र कायम आहे. ‘Bank Nifty’ साठी, ५५,००० ची पातळी अत्यंत महत्त्वाची ठरेल. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार ‘बँक ऑफ बडोदा’, ‘बँक ऑफ इंडिया’ आणि ‘स्विगी’ यांसारख्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात.

Gold Price Alert: भडका उडणार… सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा Alert ! सरकारकडून इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याच्या चर्चा

Web Title: Modi appeal trump decision impact on crude oil prices and share market see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Business News
  • Donald Trump
  • Marathi News
  • narendra modi
  • share market
  • Stock market
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
1

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
2

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?
3

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?
4

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.