Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motilal Oswal Mutual Fund कडून नवीन NFO जाहीर; स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने त्यांच्या नवीन फंड ऑफरची म्हणजेच एनएफओची घोषणा केली आहे. या फंडचे नाव “मोतीलाल ओसवाल बी एस ई स्वच्छ पर्यावरण इंडेक्स फंड” असे असून हा एक ओपन-एंडेड फंड आहे जो 'बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडचा मागोवा घेतो. कधी होणार आहे सुरु आणि कधीपर्यंत असेल? सविस्तर जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 05, 2026 | 01:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने त्यांच्या नवीन फंड ऑफरची म्हणजेच एनएफओची घोषणा केली आहे. या फंडचे नाव “मोतीलाल ओसवाल बी एस ई स्वच्छ पर्यावरण इंडेक्स फंड” असे असून हा एक ओपन-एंडेड फंड आहे जो ‘बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडचा मागोवा घेतो. हा एनएफओ शुक्रवार, 5 जून 2026 ला सुरू होत आहे आणि शुक्रवार, 19 जून 2026 ला बंद होईल.
हा फंड ‘बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडचा मागोवा घेतो, जो भारताचा स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी बनवलेला पहिला वैविध्यपूर्ण इंडेक्स आहे. हा गुंतवणूकदारांना पाच मोठ्या बदल घडवणाऱ्या विषयांमध्ये सहभागी होण्यासाठी एक सोपा मार्ग मिळवून देतो; जसे की पुनर्नविकरणीय ऊर्जा, विजेवरील गाड्या, पाण्यावरील प्रक्रिया, कचऱ्याचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन; हे सर्व विषय भारताचा ऊर्जा बदल, पर्यावरणाबद्दलची आपली जबाबदारी आणि लांबच्या काळातील आर्थिक प्रगती या सर्वांचा एक मुख्य भाग आहेत.
या एनएफओचा उद्देश एका पारदर्शक आणि नियमांवर आधारित पॅसिव्ह पद्धतीद्वारे गुंतवणूकदारांना या मोठ्या बदलात सहभागी होण्याची संधी देणे हा आहे. ‘बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडमध्ये स्वच्छ अर्थव्यवस्थेच्या साखळीतील साधारण 25 कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पुनर्नविकरणीय ऊर्जेचा वाटा इंडेक्समध्ये जवळपास 86% आहे आणि उरलेला वाटा विजेवरील गाड्या, पाणी, पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये विभागला गेला आहे.

फंडाचा मुख्य तपशील:

एनएफओचा कालावधी – 5 जून 2026 ते 19 जून 2026
योजनेचा प्रकार – ‘बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडचा मागोवा घेणारा ओपन-एंडेड फंड.
बेंचमार्क – ‘बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडचा एकूण परतावा निर्देशांक
गुंतवणुकीचे ध्येय – ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून, बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्सद्वारे दर्शविलेल्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी जुळणारा, खर्चापूर्वीचा परतावा प्रदान करणे. पण योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही खात्री किंवा हमी दिली जाऊ शकत नाही.

कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम

एनएफओ दरम्यान: एकरकमी: ₹500/- आणि त्यानंतर ₹1/- च्या पटीत
चालू: एकरकमी: ₹500/- आणि त्यानंतर ₹1/- च्या पटीत
वाटपाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी रिडीम केल्यास 1%; त्यानंतर काहीही नाही
एक्झिट लोड
वाटपाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी रिडीम केल्यास 1%; त्यानंतर काहीही नाही.
कराचे नियम
एलटीसीजी: ₹1.25 लाखांवरील नफ्यावर 12.5% (12 महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवलेली गुंतवणूक) | एसटीसीजी: 20% (≤12 महिने ठेवल्यास) (परिणामांचे स्वरूप वैयक्तिक असल्यामुळे, प्रत्येक गुंतवणूकदाराला सल्ला दिला जातो की त्यांनी योजनांमधील त्यांच्या सहभागातून उद्भवणाऱ्या कराच्या विशिष्ट रकमेबाबत आणि इतर परिणामांबाबत स्वतःच्या कर सल्लागारांशी/अधिकृत डीलर्सशी सल्लामसलत करावी)

गुंतवणूकदाराची माहिती

भारतातील स्वच्छ पर्यावरण संकल्पनेमध्ये निष्क्रिय गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन भांडवली वाढ शोधणारे गुंतवणूकदार

लॉन्चच्या निमित्ताने, मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे पॅसिव्ह व्यवसाय प्रमुख, प्रतीक ओसवाल म्हणाले, “भारत दरवर्षी तेल आणि कोळशाच्या आयातीवर $150 अब्ज खर्च करतो आणि हे भांडवल आता देशांतर्गत स्तरावर, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि स्वच्छ पायाभूत सुविधांमध्ये वळत आहे. मजबूत सरकारी धोरणांच्या पाठबळामुळे, ही या दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक संधींपैकी एक आहे. मोतीलाल ओसवाल बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना या परिवर्तनामध्ये सहभागी होण्याची आणि भारताच्या शाश्वत भविष्यात आपला हिस्सा निर्माण करण्याची एक सोपी, कमी खर्चाची संधी उपलब्ध करून देतो.”
या फंडचे व्यवस्थापन इक्विटी घटकासाठी श्री. स्वप्निल मयेकर आणि श्री. दिशांत मेहता (सहयोगी फंड व्यवस्थापक) यांच्याकडून, तसेच डेट घटकासाठी श्री. राकेश शेट्टी यांच्याकडून केले जाईल.
मोतीलाल ओसवाल बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक परवानाधारक म्युच्युअल फंड वितरकांमार्फत, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे किंवा थेट www.motilaloswalmf.com द्वारे करता येऊ शकते.

उत्पादन लेबलिंग:

हे उत्पादन अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे शोधत आहेत*
योजनेचा जोखीम मापक
बेंचमार्कचा जोखीम मापक – बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट टीआरआय
दीर्घकालीन भांडवली वृद्धी
ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून बीएसई क्लीन एन्व्हायर्नमेंट निर्देशांकाशी अनुरूप परतावा

हे उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत शंका असल्यास, गुंतवणूकदारांनी त्यांच्या वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
एनएफओ दरम्यान देण्यात आलेले वरील उत्पादन लेबलिंग हे योजनेच्या वैशिष्ट्यांचे किंवा नमुना पोर्टफोलिओचे अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित आहे आणि प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यानंतर एनएफओनंतर त्यात बदल होऊ शकतो. क्षेत्रांबाबत करण्यात आलेला वरील उल्लेख हा शिफारस किंवा गुंतवणूक सल्ला म्हणून समजू नये आणि त्याचा वापर गुंतवणूक धोरण तयार करण्यासाठी किंवा अंमलात आणण्यासाठी करू नये. ही योजना निर्देशांक-आधारित असल्याने निष्क्रिय गुंतवणूक तंत्र अवलंबते आणि बाजारातील परिस्थिती कशीही असली तरी ती केवळ निवडलेल्या एका निर्देशांकातील समाविष्ट प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करेल. ही योजना प्रामुख्याने स्वच्छ पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांमध्ये कार्यरत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते, ज्यामुळे विशिष्ट विषयक क्षेत्रामध्ये केंद्रित गुंतवणूक जोखीम निर्माण होते. त्यामुळे या योजनेची कामगिरी या क्षेत्रांमधील नियामक घडामोडी, सरकारी धोरणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि भांडवली खर्चाच्या चक्रांशी जवळून संबंधित असते.

Web Title: Motilal oswal bse clean environment index fund nfo launch see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
1

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
2

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली
3

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग
4

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.