Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News :अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांना धक्का; बिनविरोधचा फॉर्म्युला फसला,२ नोव्हेंबरला रणधुमाळी

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत. २१ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विखे-थोरात आणि शिंदे-लंके गटातील राजकीय संघर्षामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 21, 2026 | 09:33 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • विखे-थोरात विरुद्ध शिंदे-लंके; राजकीय समीकरणे बिघडली
  • २१ पैकी ८ जागा बिनविरोध; दिग्गज नेत्यांनी मारली बाजी
  • १२ हजार कोटींच्या ठेवी आणि साखर कारखान्यांच्या कर्जाचा मुद्दा ऐरणीवर
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय एकमताने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर फसले आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, जागावाटपावरून निर्माण झालेला संघर्ष आणि राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईमुळे निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

२१ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे.

विखे-थोरात विरुद्ध शिंदे-लंके; राजकीय समीकरणे बिघडली

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठका झाल्या. मात्र, जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीवर एकमत होऊ शकले नाही.

राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधील समर्थक चार उमेदवारांची नावे सोशल मीडियावर जाहीर केल्याने विखे-थोरात गटात नाराजी निर्माण झाली. दुसरीकडे निलेश लंके यांनीही स्वतंत्र राजकीय रणनीती कायम ठेवल्याने निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

‘जयकुमार गोरेंना रोज ३ हजार रुपये देतो, विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसा’; अतुल लोंढेंचे खुले आव्हान

२१ पैकी ८ जागा बिनविरोध; दिग्गज नेत्यांनी मारली बाजी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आठ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप, राहात्यातून सुजय विखे पाटील, कोपरगावमधून विवेक कोल्हे, संगमनेरमधून रंजीत देशमुख, नेवासामधून शंकरराव गडाख आणि शेवगावमधून राजश्री घुले पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर माघार घेतल्याने प्रताप पाचपुते यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…

१२ हजार कोटींच्या ठेवी आणि साखर कारखान्यांच्या कर्जाचा मुद्दा ऐरणीवर

राजकीय संघर्षाबरोबरच जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बँकेकडे सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचा आकडा पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

या कर्जापैकी किती रक्कम थकीत आहे, किती वसुली झाली आणि किती कर्ज नियमित आहे, याबाबत पारदर्शक माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संचालकपदासाठी सुरू असलेल्या राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

आता उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विखे-थोरात गटाचे वर्चस्व राहणार की शिंदे-लंके गट बाजी मारणार, याचा फैसला ३ नोव्हेंबरच्या निकालातून होणार आहे.

Web Title: Ahilyanagar district bank elections vikhe thorata suffer setback unopposed formula fails elections for 13 seats on november 2cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Ahilyanagar politics
  • District Bank Election
  • Marathi News

संबंधित बातम्या

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या
1

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या

Breaking News :समुद्रात निसर्गाचा चमत्कार ;ओमानच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिनचे दर्शन
2

Breaking News :समुद्रात निसर्गाचा चमत्कार ;ओमानच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिनचे दर्शन

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार
3

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार

Sangali DCC Bank Election: जिल्हा बँकेच्या २१ पैकी १९ जागा बिनविरोध; जत, कवठेमहांकाळमध्ये लढत!
4

Sangali DCC Bank Election: जिल्हा बँकेच्या २१ पैकी १९ जागा बिनविरोध; जत, कवठेमहांकाळमध्ये लढत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.