मोतीलाल ओसवाल फाउंडेशन ने पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीसाठी तात्काळ केली 50 लाख रुपयांची मदत जाहीर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुंबई: मोतीलाल ओसवाल फाउंडेशनने महाराष्ट्रातील पूरग्रस्त मराठवाडा भागातील मदत कार्यांसाठी ₹50 लाख देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, फाउंडेशनने ग्रुपच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या देणग्यांना 1:1 प्रमाणात जोडण्याचे वचन दिले आहे. “ग्लोबल विकास ट्रस्ट फंड” आपदग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना सक्रियपणे रकमेचे वितरण करेल आणि पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असलेली मदत पोहोचवेल.
आपली वैयक्तिक बांधिलकी जाणून, मोतीलाल ओसवाल फाउंडेशनचे ट्रस्टी श्री रामदेव अग्रवाल आणि श्रीमती सुनीता अग्रवाल यांनी श्री मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) मधील आपल्या सहकाऱ्यांसोबत मराठवाड्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने मदत कार्य सुरू केले.
हे कार्य फाउंडेशनच्या GVT सोबत असलेल्या विद्यमान भागीदारीवर आधारित आहे. हा उपक्रम कृषिकुल प्रकल्पाद्वारे 2024 मध्ये परळी, महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आला होता ज्यामध्ये २५ एकर जमिनीवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे.
कृषिकुल शेतकऱ्यांचे दीर्घकालीन सशक्तीकरण आणि शाश्वत उपजीविका प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. पूरग्रस्तांना मदत करण्याचे कार्य प्रयत्न फाउंडेशनच्या समाजाच्या तात्कालीन गरजांकडे लक्ष पुरवण्याची क्षमता दर्शविते.
मोतीलाल ओसवाल, एमडी आणि सीईओ, MOFSL यांनी सांगितले, “मोतीलाल ओसवाल फाउंडेशनमध्ये, संकटाच्या आणि विकासाच्या काळातही समाजासाठी उभे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. मराठवाड्याला आमचे समर्थन म्हणजे मराठवड्यातील पूरामुळे संकटग्रस्त झालेल्या जनतेला तातडीने आणि सहानुभूतीने प्रतिसाद देणे, आणि ग्लोबल विकास ट्रस्ट सोबतच्या आमच्या भागीदारीतून ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खातरजमा करणे होय.”
MOFSL चे अध्यक्ष रामदेव अग्रवाल, पुढे म्हणाले, “शेतकऱ्याचा मुलगा असल्याने, मी ग्रामीण भारतातील संघर्ष आणि आकांक्षांशी खोलवर जोडलेलो आहे. मराठवाड्यामधील पूर पुनः एकदा याची वेदनादायी आठवण करुन देतो की आमचा शेतकरी समुदाय किती असुरक्षित आहेत आहे. ज्याप्रमाणे काळ आणि संकटे बदलत आहेत, त्याचप्रमाणे आपली तयारी आणि प्रतिसादही बदलणे आवश्यक आहे. ग्लोबल विकास ट्रस्टसोबतच्या आमच्या कार्यातून, ही मदत लवकर पोहोचावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे जीवन पुनः नव्याने उभे करण्यात मदत करावी अशी इच्छा ठेवतो. अशा संकटांच्या काळात संपूर्ण शेतकरी समुदायाने एकत्रितपणे मजबूतीने उभे राहिले पाहिजे.”
या उपक्रमाच्या माध्यमातून, मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखीत करते, आणि संकटाच्या क्षणांत सहानुभूतीपूर्वक ग्रामीण भागाच्या उत्थानात दूरदृष्टीने, दीर्घकालीन गुंतवणूक करते.