खोपोली नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडती नगरपरिषद सभागृहात पार पडली. एकूण ३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले, त्यात १९ जागा सर्वसाधारण, ८ जागा ओबीसी, ३ जागा एससी आणि १ जागा एसटी साठी राखीव ठेवण्यात आली होती. सोডतीदरम्यान प्रभाग क्रमांक २, ३ आणि ५ मध्ये एससी आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांवर पक्षपात आणि सेटिंग केल्याचा आरोप केला. तसेच, या प्रभागात वारंवार एससी आरक्षण पडल्यामुळे इतर प्रभागातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचेही शेकापचे नेते कैलास गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र देवकर आणि आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांनी व्यक्त केले. सोडतीत शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांमध्ये संताप आणि विरोधाचे वातावरण निर्माण झाले असून, काही पक्षांनी यावर अधिक स्पष्टता आणि न्याय्य आरक्षणाची मागणी केली आहे.