अरुण जेटली स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
Test Arun Jaitley Stadium pitch report : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दूसरा सामन्यासाठी फिरोजशाह कोटला चांगली फलंदाजीची खेळपट्टी तयार केली गेली आहे. क्युरेटर्सना अपेक्षा आहे की पहिल्या दोन दिवसांसाठी खेळपट्टी स्ट्रोकप्लेसाठी अनुकूल असणार आहे. परंतु खेळ पुढे सरकत असताना हळूहळू ती बदलत जाणार आहे. कोटलाचा पारंपारिक काळ्या मातीचा पृष्ठभाग सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असल्याचे माहीत आहे.परंतु, हळूहळू ही खेळपट्टि फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल बनत जाते. तथापि, या कसोटीसाठी एक नवीन सेंटर पिच तयार करण्यात आले आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या काळात फलंदाजांचे वर्चस्व असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचे पुनरागमन नाहीच! ‘या’ माजी खेळाडूचे खळबळजनक विधान चर्चेत
बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली आहे की, “कसोटीसाठी सेंटर पिच तयार केले गेले आहे. स्मृती मानधनाने ५० चेंडूत शतक झळकावलेल्या खेळपट्टीपेक्षा ती निश्चितच वेगळी असणार आहे.” अधिकाऱ्याच्या मते, क्युरेटर्सनी जाणूनबुजून सुरुवातीच्या टप्प्यात एकसमान उसळी आणि योग्य खेळपट्टी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, म्हटले आहे की, “जर वेस्ट इंडिजने चांगली फलंदाजी केली तर सामना पूर्ण पाच दिवस चालणार आहे. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्ट्या फक्त वळण घ्यायला लागले आणि तेही संथ गतीने.” स्थानिक क्युरेटर अंकित दत्ता खेळपट्ट्यांच्या तयारीचे निरीक्षण करत असून बीसीसीआयचे वरिष्ठ क्युरेटर तपोष चॅटर्जी आणि आशिष भौमिक अंतिम टच हाताळत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : IND vs AUS : रोहित शर्मा करणार भीम पराक्रम! शाहिद आफ्रिदीच्या विश्वविक्रमाला करणार उद्ध्वस्त; वाचा सविस्तर
कोटला ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या संथ वळण देणाऱ्या खेळपट्ट्यांसाठी ओळखण्यात येते. जिथे खेळ पुढे सरकत जात असताना फिरकीपटू हळूहळू आपली जादू दाखवला सुरवात करतील. परंतु या कसोटीसाठी, तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रापर्यंत फलंदाजांना अपेक्षित आराम मिळू शकण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल (कर्णधार) , यशस्वी जैस्वाल,केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) ,रवींद्र जडेजा , नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बूमराह, प्रसिद्ध कृष्णा