Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी! मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार

राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार झाला. यामुळे 8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 20, 2025 | 06:46 PM
Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार

Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार

Follow Us
Close
Follow Us:
  • Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार
  • मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार
  • विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराची संधी
राज्यातील तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

 

या कराराअंतर्गत टोयोटा-किर्लोस्कर कंपनी महाराष्ट्रातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये (LMV) हलक्या वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा उभारणार आहे. याचबरोबर या प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, या उपक्रमामुळे सुमारे ८,००० आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Kolhapur News : महा ई सेवा नवीन केंद्राच्या परवानगीस ‘ब्रेक’; चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिला आदेश

करारावर टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रमजी गुलाठी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख यांनी स्वाक्षरी केली. पुढील ५ वर्षांत ४५ प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील १३ प्रयोगशाळा मार्च २०२६ पर्यंत सुरू होतील. उर्वरित प्रयोगशाळा तीन टप्प्यांत सुरू केल्या जातील, असे गुलाठी यांनी सांगितले.

कौशल्य विभाग आयटीआय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे तरुणांना जागतिक रोजगार बाजारपेठेत संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. तसेच उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने आयटीआयमधील पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून कुशल मनुष्यबळ घडविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील काळात आणखी रोजगाराभिमुख MoU केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना

या कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सहसंचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै, आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के उपस्थित होते.

Web Title: Mou signed between toyota kirloskar motor and iti under the guidance of mangalprabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mangal Prabhat Lodha
  • toyota

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! ‘या’ जातील विशेष मागणी
1

Ahilyanagar News: गाढवांना आला चक्क सोन्याचा भाव! ‘या’ जातील विशेष मागणी

Ahilyanagar News: हे चाललंय तरी काय? सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल! महावितरणच्या कार्यालयात आंदोलन
2

Ahilyanagar News: हे चाललंय तरी काय? सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल! महावितरणच्या कार्यालयात आंदोलन

“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान
3

“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
4

Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.