मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! (Photo Credit - X)
भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले २०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत.
खर्च: ५५६ कोटी
२,००,००० चौ. फुट क्षेत्रफळ
१० लाख प्रवाशांना हातळण्याची क्षमता
लहरी छताची रचना
एमआयसीटी प्रकल्पात एकूण कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली एमआयसीटीची रचना लहरी छताने केली आहे. मुंबई अतिरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले.
ते अंदाजे ४.१५ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या टर्मिनलमध्ये २२ लिफ्ट, १० एक्सेलेटर आहेत. विशेषतः हे टर्मिनल एका वेळी २ मोठ्या क्रूझ जहाजांना सहज हाताळू शकते. या क्रूझ टर्मिनलचे डिजाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे.
क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना
नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता बाळगून असणार आहे. अशा पद्धतीची संपूर्ण रचना या कूवाची आहे. याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. सरकारने कूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे, ४,१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी १० लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. एकाच दिवशी १५ हजार पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे असल्याने एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे.
मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र
मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र राहिले आहे. १६९० पासून सुरू झालेला हा वारसा १८७३ मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या (आता मुंबई पोर्ट अथॉरिटी) स्थापनेने अधिक सशक्त झाला. आता या वारणाला पर्यटनाच्या दृष्टीने नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईला ‘क्रूझ हब’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचा महत्त्वपूर्ण टाया म्हणजे हे टर्मिनल, या क्रूझ टर्मिनलवर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात. याची लाबी ११ मीटर आणि लांबी ३०० मीटरपर्यंत आहे. पार्किंगमध्ये एकाच वेळी ३०० हुन अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात.






