
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE ने गेल्या पाच वर्षांत आपल्या भागधारकांना दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. या दोन्ही वेळी या स्टॉकने २:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचे वितरण केलं आहे. म्हणजेच,प्रत्येकी एका शेअरमागे दोन शेअर अशा प्रमाणात शेअर्सचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे आता ज्या गुंतवणूकदारांकडे पाच वर्षांपूर्वी १०० शेअर्स होते, त्यांच्याकडे आताबोनस शेअर्स मिळाल्यानंतर आता ९०० शेअर्स झाले आहेत. म्हणजे 100 शेअर्सचे 900 शेअर्स झाले आहेत.
BSE च्या शेअर्समध्ये गेल्या 6 वर्षांत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. हा शेअर मागील 6 वर्षांत ६,००६% इतका वाढला. २१ ऑगस्ट २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स ₹५४.५० वर होते. गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी एक्सचेंजचे शेअर्स एनएसईवर ₹३,३२८ वर बंद झाले. बीएसई शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹४,४४६.८० इतका आहे. एक्सचेंजच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ₹२,०२१.५० इतका आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपिटलने गुरुवारी ₹१.३५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
BSE चे शेअर्स गेल्या ५ वर्षांत २६२६% नी वाढले आहेत. २७ ऑगस्ट २०२१ रोजी एक्सचेंजचे शेअर्स ₹१२२.१० वर होते. गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी शेअर्स ₹३३२८ वर बंद झाले. गेल्या ४ वर्षांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअर्समध्ये १४५१% वाढ झाली आहे. तर तीन वर्षांत हे शेअर्स १००५% नी वाढले आहेत. गेल्या २ वर्षांत BSE शेअर्स २५२% नी वाढले आहेत. एका वर्षात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स ५२% पेक्षा जास्त वाढ दिसून आली.
BSE चा आयपीओ २३ जानेवारी २०१७ रोजी खुला झाला होता. आणि तो पुढे २५ जानेवारीपर्यंत खुला राहिला होता. तेव्हा शेअरची किंमत ₹८०६ रुपये इतकी होती. सार्वजनिक गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १ लॉट आणि कमाल १३ लॉटसाठी बोली लावू शकत होते. BSE चे शेअर्स ३ फेब्रुवारी २०१७ रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE वर ₹१०८५ रुपयांना लिस्टेड झाला. या दिवशी BSE चे शेअर्स ₹१०६९.२० वर बंद झाले. BSE आयपीओ ५१.२२ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदार वर्गाकडून ३५.९७ पट इतका प्रतिसाद मिळाला.