Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम,मुंबईत गृहविक्रीत ३१ टक्के घट

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (MMR) मध्ये गृहविक्रीत ३१ टक्क्यांची घट झाल्याचे तसेच नवीन प्रकल्पही कमी झाले असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार आणि सल्ला देणाऱ्या मंचाच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 20, 2025 | 05:08 PM
राज्यातील निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम, मुंबईत गृहविक्रीत ३१% घट (फोटो सौजन्य-X)

राज्यातील निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम, मुंबईत गृहविक्रीत ३१% घट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे (MMR) मध्ये गृहविक्रीत ३१ टक्क्यांची घट झाल्याचे तसेच नवीन प्रकल्पही कमी झाले असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार आणि सल्ला देणाऱ्या मंचाच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.

गृह विक्रीच्या संख्येत घट होण्यामागचे कारण प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुका तसेच मालमत्तेच्या वाढत्या किंमती असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: अॅन्युअल राऊंडअप २०२४’ अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा भारताच्या रेसिडेन्शियल मार्केटमध्ये लक्षणीय वाटा असल्याने समग्र देशाच्या आकडेवारीत देखील ही घट प्रतिबिंबित झालेली दिसते. हा डेटा दर्शवितो की गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एनसीआर वगळता देशभरात घरांच्या विक्रीत घट झाली आहे.

ऑटोमोटिव्ह स्टीलचे उत्पादन बूस्ट करण्यासाठी ‘या’ कंपनीचे महत्वाचे पाऊल, लवकरच अत्याधुनिक सुविधा सुरू करणार

निवडणुकांचा प्रभाव २०२४च्या तिमाहीतमध्ये लॉन्च होणाऱ्या नवीन घरांच्या संख्येवर देखील स्पष्ट दिसून आला. या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत ३९% घट झाली आहे. याचे कारण आहे राज्यातील निवडणुकांमुळे प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया मंदावली होती. अहवालात समाविष्ट असलेल्या ८ पैकी ५ शहरांमध्ये २०२४च्या अंतिम तिमाहीत नवीन घरे लॉन्च होण्याची संख्या कमी झाली आहे.

हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, “ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या मोसमात मागील तिमाहीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. परंतु विक्री आणि नवीन लॉन्चिंग या दोन्ही बाबतीत मागील वर्षाच्या या कालखंडाशी तुलना केल्यास बहुतांशी भागांमध्ये घट झाल्याचेच दिसून येते. जागतिक आर्थिक अनिश्चितता, मुख्य राज्यांमधील निवडणुका आणि देशभरात मालमत्तेच्या किंमतीत झालेली वाढ या घटकांमुळे विकासक आणि खरेदीदार या दोघांनी थांबून प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते.” तसेच “दिल्ली एनसीआर हे घरांच्या विक्रीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत वृद्धी दाखवणारे एकमेव मार्केट ठरले. एमएमआर, पुणे आणि बंगळूर या मोठ्या बाजारपेठांसहित इतर प्रांतांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. व्याज दारांत घट होण्याची शक्यता इतक्यात दिसत नसल्याने आणि आर्थिक वृद्धी मंदावल्यामुळे आगामी तिमाहींमध्ये मार्केट सावध राहील अशीच अपेक्षा आहे.”

नवीन घरांची विक्री

सर्वात मोठ्या आठ शहरांपैकी फक्त दिल्ली एनसीआरमध्ये नवीन घरांच्या विक्रीत सकारात्मक वृद्धी नोंदवण्यात आली आहे. या प्रांतात ऑक्टोबर-डिसेंबर२४ या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ९८०८ इतकी नवीन घरे विकली गेली. ही संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६५२८ होती. ३३,६१७ घरांच्या विक्रीसह एमएमआरने मार्केट लीडर म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. परंतु गेल्या वर्षी हा आकडा ४८,५५३ होता, म्हणजेच यात ३१% वार्षिक घट झाली आहे. त्या पाठोपाठ पुण्यात १८,२४० घरे विकली गेली, ही देखील ३१% वार्षिक घट आहे. दक्षिणेत बंगळूर येथे १३,२३६ घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे (वार्षिक २३% घट), हैदराबादेत १३,१७९ घरांच्या विक्रीची नोंद आहे (वार्षिक ३६% घट), तर चेन्नई येथे ४०७३ घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे (वार्षिक ५% घट).

नवीन घरांचे लॉन्चिंग

२०२४ वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशातील सर्वात मोठ्या आठ हाऊसिंग मार्केट्समध्ये नवीन घरांच्या लॉन्चिंगमध्ये वार्षिक ३३% घट झाली आहे. हैदराबादमध्ये सर्वात जास्त घट झाली असून केवळ ९०६६ घरे लॉन्च झाली (६६% घट), त्या पाठोपाठ अहमदाबादेत ३५१५ घरे (६१% घट) आणि कोलकाता येथे ३०९१ घरे (४१% घट) लॉन्च झाली आहेत. सकारात्मक बाजू ही आहे की, दिल्ली एनसीआरमध्ये १००४८ घरांच्या लॉन्चिंगसह वार्षिक १३३% वाढ झाली आहे. चेन्नई येथे ४००५ घरांसह ३४% वाढ आणि बंगळूर येथे १५१५७ घरांसह वार्षिक २०% वाढ झाली आहे.

भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स वित्तीय सेवा यांची डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी

Web Title: Mumbai home sales fall by 31 percentage in october december 2024 and new projects also fall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News
  • real estate

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
3

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.