जगातील दोन आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी अग्रेसर असलेल्या ArcelorMittal Nippon Steel India ने या वर्षी प्रगत ऑटोमोटिव्ह स्टील उत्पादनांच्या निर्मितीसाठी समर्पित दोन अत्याधुनिक उत्पादन सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
ही सुविधा सुरू झाल्यानंतर, दोन्ही युनिट्सच्या उत्पादनामुळे यापुढे संपूर्ण ऑटोमोटिव्ह क्षेत्राला आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या स्टीलची आयात करण्याची आवश्यकता पडणार नाही, ज्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाला चालना मिळणार आहे. याव्यतिरिक्त, सर्व उत्पादने मूळ कंपन्या म्हणजेच आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन स्टीलच्या गुणवत्ता मानकांशी जुळतील. सध्या जागतिक स्तरावर उपलब्ध असलेली काही उत्पादनांची सुद्धा पहिल्यांदाच भारतात निर्मीती केल्या जाईल.
हीच ती सुवर्ण संधी ! जानेवारी 2025 पर्यंत Honda Amaze मिळत आहे ‘या’ इंट्रोडक्टरी किंमतीत
कंटिन्युअस गॅल्वनायझिंग लाइन (CGL) आणि एक कंटिन्युअस गॅल्वनायझिंग अँड अॅनिलिंग लाइन (CGAL), ज्यामध्ये मूळ कंपन्यांचे तांत्रिक ज्ञान समाविष्ट आहे, ज्या 2025 मध्ये पूर्णपणे कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही सुविधा गुजरातमधील हजिरा येथील त्यांच्या प्रमुख प्लांटमध्ये येणाऱ्या कोल्ड रोलिंग मिल 2 (CRM2) कॉम्प्लेक्सचा भाग असतील.
या दोन्ही युनिट्समुळे आर्सेलर मित्तल तसेच निप्पॉन स्टीलच्या परवानाधारक उत्पादनांचे उत्पादन शक्य होईल, ज्यांची क्षमता 1180 MPa पर्यंत आहे, कोटेड आणि अनकोटेड स्टीलमध्ये. गेल्या वर्षी ऑप्टिगल® आणि मॅग्नेलिस® सादर करून ArcelorMittal Nippon Steel India ने मिळवलेल्या यशावर हा उपक्रम आधारित आहे.
या विस्ताराचे उद्दिष्ट भारतातील उच्च-गुणवत्तेच्या ऑटोमोटिव्ह स्टीलची वाढती मागणी पूर्ण करणे आहे, जी सध्या फ्लॅट स्टीलसाठी 7.8 दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे आणि दरवर्षी 6-7 टक्क्याने वाढण्याचा अंदाज आहे.
Auto Expo 2025 मध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून दोन नवीन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप ऊमेन म्हणाले,“ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या वाढत्या गरजांनुसार उच्च-गुणवत्तेचे, प्रीमियम स्टील सोल्यूशन्स देण्याच्या आमच्या ध्येयाकडे समर्पित दोन युनिट्स एक महत्त्वपूर्ण पाऊल आहेत. आमच्या विस्तृत श्रेणीतील उत्पादने आणि सेवांसह, आमची कंपनी ही ऑटोमोटिव्ह उत्पादकांमध्ये उत्तम स्थितीप्राप्त आणि सर्वांचे प्राधान्य असलेला पर्याय आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, या नवीन उपक्रमामुळे आम्हाला केवळ जागतिक स्तरावर व्यापकपणे मान्यताप्राप्त नवीन उत्पादने स्वदेशीरित्या बनवता येणार नाही तर आमचा पोर्टफोलिओ तसेच आमच्या बाजारपेठेतील वाटा वाढविण्यास देखील मदत होईल. देशाच्या स्टील इकोसिस्टमला बळकटी देण्याच्या आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्याच्या आमच्या धोरणात हा विस्तार महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला बळकटी मिळेल.”
दरम्यान, AM/NS इंडिया नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये आर्सेलर मित्तलच्या मल्टी पार्ट इंटिग्रेशन™ (MPI) सोल्यूशनसह त्यांच्या विविध ऑटोमोटिव्ह ऑफरिंग्ज प्रदर्शित करत आहे. प्रदर्शित होणाऱ्या नवकल्पकतांमध्ये सहा प्रगत ऑटोमोटिव्ह घटकांचा समावेश आहे जसे की, नेक्स्ट-जनरेशन डोअर रिंग आणि अत्याधुनिक बॅटरी पॅक जे मूळ उपकरण उत्पादकांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करतात.