Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!

150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती असलेल्या जगातील शहरांमध्ये चीनचे वर्चस्व आहे. भारताला या देशांच्या यादीमध्ये स्थान मिळवता आले नसले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक उंच इमारती असलेल्या शहरांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईने पुन्हा आकाशाला गवसणी घातली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 02, 2024 | 03:31 PM
मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!

मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!

Follow Us
Follow Us:

उंच उंच इमारती, गगनचुंबी टॉवर्स यांची सर्वांनाचा भुरळ पडते. अनेकांना गगनचुंबी इमारतींमध्ये राहण्याचे आकर्षण असते. मात्र, तुम्हांला माहीतीये का जगात सर्वाधिक उंच इमारती अर्थात 150 मीटर पेक्षा अधिक उंच इमारती कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे भारताला या देशांच्या यादीमध्ये स्थान नसले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक उंच इमारती असलेल्या शहरांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर आहे. मुंबई वगळता अन्य कोणत्याही शहराला पहिल्या १०० शंभर सर्वाधिक उंच इमारती असलेल्या शहरांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती चीनमध्ये सर्वाधिक

अमेरिकेनंतर चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या तीन दशकांत या देशाने अनेक आघाड्यांवर मोठी कामगिरी केली आहे. यामध्ये रिअल इस्टेटचाही समावेश आहे. अनेक वर्षांपासून हे क्षेत्र चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दरम्यान, 150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती असलेल्या जगातील शहरांमध्ये चीनचे वर्चस्व आहे. अशा टॉप 10 शहरांमध्ये चीनमधील सहा शहरांचा समावेश आहे. तर भारतातील एकही शहराला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. असे असले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – ‘या’ छोट्या कंपनीच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; जीएमपी देतोय चांगल्या परताव्याचे संकेत!

दुबईचा या यादीत चौथा क्रमांक

चीनमध्ये 300 मीटरपेक्षा उंच 57 इमारती आहेत. याउलट भारतात 300 मीटरपेक्षा उंच असलेली केवळ एकच इमारत आहे. हॉंगकॉंग या शहरात 558 इमारती आहेत. ज्यांची उंची 150 मीटरपेक्षा जास्त आहे. या यादीत चीनचे शेन्झेन हे शहर ४१४ इमारतींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत न्यूयॉर्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरात 318 उंच इमारती आहेत. चौथा क्रमांक दुबईचा आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा देखील आहे. जिची उंची 828 मीटर इतकी आहे.

मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर

भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे. मुंबई शहरातील 101 इमारतींची उंची 150 मीटरपेक्षा जास्त आहे. यापैकी 42 इमारतींची उंची 200 मीटरपेक्षा जास्त आहे, तर एका इमारतीची उंची 300 मीटरपेक्षा जास्त आहे. मुंबईशिवाय टॉप 100 उंच इमारतींच्या यादीमध्ये एकही भारतीय शहराला स्थान मिळवता आलेले नाही. या यादीत कोलकाता हे शहर 114 व्या क्रमांकावर आहे. कोलकातामध्ये 10 इमारती 150 मीटरपेक्षा जास्त उंच आहेत.

Web Title: Mumbai ranks 15th in the list of cities with the tallest buildings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
1

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
2

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती
3

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन
4

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.