Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

मुंबईतील केईएम रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी रक्त आणि पीआरबीसी मिळवताना नातेवाइकांची धावपळ होत असल्याची दोन प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे गरजेच्या वेळी रक्तघटक उपलब्ध होण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2026 | 11:17 AM
मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

Follow Us
Follow Us:
  • महिला रुग्णासाठी सहा युनिट पीआरबीसी मिळवण्यासाठी तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.
  • ज्येष्ठ रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी दोन युनिट रक्त मिळवताना कुटुंबीयांची दमछाक झाली.
  • या दोन घटनांमुळे रक्तघटकांची उपलब्धता आणि वेळेवर होणारा पुरवठा याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रक्त आणि रक्तपेशी मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत असल्याची दोन प्रकरणे परळ येथील केईएम रुग्णालयात समोर आली आहेत. एका महिला रुग्णासाठी सहा युनिट पीआरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी आवश्यक असताना तीन दिवसांपासून त्यासाठी चौकशी सुरू होती. दुसऱ्या गंभीर आजाराने ग्रस्त ज्येष्ठ रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी दोन युनिट रक्त मिळवण्यासाठी कुटुंबीयांना तीन दिवस प्रयत्न करावे लागले. अखेर चौथ्या दिवशी रक्ताची व्यवस्था झाल्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली. या घटनांमुळे मुंबईतील रक्तपुरवठ्याच्या उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान राज्य रक्त संक्रमण परिषदेला संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

तीन दिवसांपासून चौकशी

केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला बी पॉझिटिव्ह गटाच्या सहा युनिट पीआरबीसीची गरज आहे. रुग्णाच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, रक्तपेशी मिळवण्यासाठी ते गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी चौकशी करत आहेत. मात्र, अद्याप आवश्यक रक्तपेशी उपलब्ध झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले, गंभीर परिस्थितीत उपचारांसाठी आवश्यक रक्तघटक मिळवताना नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या प्रकरणातून समोर आली आहे.

युद्धपातळीवर करावे लागले प्रयत्न

  • दुसऱ्या प्रकरणात गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी ए पॉझिटिव्ह गटाच्या दोन युनिट रक्ताची आवश्यकता होती, रुग्णाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रक्त मिळवण्यासाठी सलग तीन दिवस प्रयत्न सुरू होते.
  • अखेर चौथ्या दिवशी दोन युनिट रक्ताची व्यवस्था झाली. त्यापैकी एक युनिट रुग्णालयाच्या रक्तपेढीने उपलब्ध करून दिले, तर दुसरे युनिट रुग्णाच्या मुलाने प्रयत्न करून मिळवले.
  • त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या रक्ताची गरज पूर्ण झाली आहे. दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्त किया रक्तघटक मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागल्याचे सांगितले.
Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध होणे अतिशय महत्त्वाचे

रुग्णालयात उपचार सुरू असताना आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी नातेवाइकांना अनेक दिवस शोधाशोध करावी लागत असल्याने रुग्णसेवेवरील ताणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या दोन प्रकरणांवरून मुंबईतील रक्ताचा एकूण तुटवडा किती आहे, हे स्पष्ट होत नसले तरी रुग्णांना रक्तघटक मिळवताना येणाऱ्या अडचणींची गंभीरता अधोरेखित होते. शहरातील रक्तसाठा, रक्तगटानुसार उपलब्धता आणि रक्तपेढ्यांमधील पुरवठ्याची स्थिती यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाल्यास या समस्येची व्याप्ती स्पष्ट होऊ शकेल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Mumbai kem hospital blood shortage prbc availability patient relatives struggle nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Hospital
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
1

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास
2

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.