Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Namo Shetkari Yojana : बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी मिळणार? 4 नोव्हेंबरला निर्णय

Namo Shetkari Yojana Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक शेतकरी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. घोषणा केली पण त्यांची अंमलबजवणी कधी असा प्रश्न उभा राहताना, या संदर्भातील निर्णय 4 नोव्हेंबरच्या बैठकीत होणार अशा शक्यता आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 03, 2026 | 02:52 PM
PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी? ( सौजन्य - सोशल मीडिया )

PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • बळीराजासाठी महत्त्वाची बातमी!
  • PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी?
  • 4 नोव्हेंबरच्या बैठकीत होणार निर्णय?
Namo Shetkari Yojana Installment : PM Kisan योजनेचा हफ्त्याची प्रतिक्षा संपल्यानंतर आता शेतकरी नमो शेतकरी हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहे. राज सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यात शेतकऱ्यांना प्रत्येकी 5000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार आहे? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार ? सविस्तर जाणून घेऊयात. ( Namo Shetkari Yojana Installment ) 

Swiggy Gig Workers Insurance : स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी घोषणा! 25 लाख जणांना फायदा; मिळणार 10 लाखांपर्यंतचा विमा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त आहे. यापूर्वी हा आकडा 265 होता. या सर्व तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण राज्यातील शेतकरी अजूनही नमो शेतकरी महसन्मान निधी योजनेच्या निधीी वाट पाहत आहेत.

दिवाळीपूर्वी खात्यात ₹5,000 जमा होतील का?

महाराष्ट्र सरकारच्या घोषणेनुसार, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार सध्या सर्वेक्षण करत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, ते या आर्थिक मदतीसाठी पात्र असतील. मात्र, ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. तुमच्याकडे पीक विमा असल्यास, मदत मिळवणे अधिक सोपे होईल. तुम्हाला शेतकरी नोंदणीचीही आवश्यकता भासू शकते. तुम्ही अद्याप नोंदणी केली नसल्यास, तुमची शेतकरी नोंदणी त्वरित करून घ्या. शेतकरी नोंदणीची ‘टप्प्याटप्प्याने प्रक्रिया’ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कधी येणार नमो शेतकरी योजनेचा निधी?

नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मार्च महिन्यात वितरित करण्यात आला होता. तेव्हापासून शेतकरी ₹2,000 च्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र सरकार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ₹6,000 देखील देते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २३वा हप्ता २० जून रोजी वितरित करण्यात आला होता. आता पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याची तारीखही जवळ येत आहे. मात्र, नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

असं बोललं जात आहे की सरकार एखाद्या मोठ्या सणाच्या वेळी याची घोषणा करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही आनंदाची बातमी मिळू शकते. पण, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील का?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा आणि १०वा हप्ता एकाच वेळी वितरित होण्याचीही शक्यता आहे. जर ही रक्कम दिवाळीनंतर वितरित झाली, तर लाभार्थी शेतकऱ्यांना ४००० रुपये एकाच वेळी मिळू शकतील. दरम्यान 4 नोव्हेंबरला यावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नमो शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

Reliance चे शेअर सुसाट… Mukesh Ambani पुन्हा बनले नंबर वन! आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा अव्वल स्थानावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर शेतकरी कोणत्या योजनेची वाट पाहत आहेत?

    Ans: शेतकरी केंद्र सरकारच्या पीएम किसान पाठोपाठ राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनेच्या थकीत हप्त्यांची वाट पाहत आहेत.

  • Que: नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळते?

    Ans: योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये (प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये) दिले जातात, जे पीएम किसानच्या ६,००० रुपयांवतिरिक्त असतात.

  • Que: हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काय तपासावे?

    Ans: शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे, DBT सुविधा चालू असणे आणि e-KYC पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

Web Title: Namo shetkari yojana installment update december decision marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • PM Kisan Scheme

संबंधित बातम्या

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती
1

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम
2

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
3

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.