
photo- social Media
Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. प्रमोद वाकळे, संतोष डाबरे, डॉ. सतीश जाधव, अमोल झापे, ओमसिंग राजपूत, अनुजा सावळे, अॅड. गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.हवामान बदल आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी विविध महिला बचत गट आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, राज्य शासनाकडून दुष्काळसदृश्य परिस्थितीत आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ५ हजार रुपयांचा अग्रिम लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकूण ७ हजार रुपयांचा आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे.
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची गरज तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे. हरभरा, ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.