Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम

Khamgaon Cotton Farmer Training through Kapas Kisan App: भारतीय कापूस महामंडळाच्यावतीने खामगाव येथे आयोजित शेतकरी जनजागृती शिबिरात कापूस खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि 'कपास किसान' मोबाइल ॲपच्या डिजिटल सुविधांची माहिती देण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 30, 2026 | 09:38 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • कापूस खरेदीतील पारदर्शकतेसाठी जनजागृती
  • डिजिटल सुविधांसह आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती
  • HDPS तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे मार्गदर्शन
खामगाव: कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, शेतकऱ्यांना डिजीटल सुविधांची माहिती देणे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कापसाची उत्पादकता वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने शेतकरी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सतर्कता जागरूकता सप्ताहांतर्गत बुधवारी खामगाव येथील औदार्या अॅग्रो इंडस्ट्रीज येथे हे शिबिर पार पडले. या उपक्रमातून कापूस खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता, डिजीटल सुविधांचा वापर आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय कापूस महामंडळाच्या अकोला शाखेचे सतर्कता अधिकारी सुनीलकुमार पात्रा, खामगाव केंद्राचे केंद्रप्रभारी आदित्य वामन, नितीन साकरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, फॅक्टरी व्यवस्थापक संजूभाऊ घोगरे यांच्यासह परिसरातील शेतकरी या शिबिराला उपस्थित होते. शेतकऱ्यांना कापूस विक्रीच्या प्रक्रियेची माहिती मिळावी, तसेच महामंडळाच्या विविध उपक्रमांचा लाभ घेता यावा, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शिबिरादरम्यान भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कपास किसान’ मोबाइल अॅपची सविस्तर माहिती देण्यात आली.

डिजीटल माध्यमांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदीशी संबंधित प्रक्रिया समजून घेणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध डिजिटल सुविधांची माहिती करून घेत त्यांचा प्रभावी वापर करावा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कापूस खरेदी व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे, शेतकऱ्यांना प्रक्रियेविषयी योग्य माहिती उपलब्ध करून देणे आणि गैरसमज दूर करणे, यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसंदर्भातील नियम, प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती वेळेवर घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

बदलत्या शेती परिस्थितीत उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची भूमिका महत्त्वाची ठरते. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाशी संबंधित तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासोबतच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावरही भर देण्यात आला. सतर्कता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरात शेतकऱ्यांचे हित जपणे, कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढविणे या बावींना प्राधान्य देण्यात आले.

शेतकरी आणि संबंधित यंत्रणा यांच्यात माहितीची देवाणघेवाण वाढविणे, तसेच आधुनिक शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग ठरला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रियेची योग्य माहिती मिळावी आणि उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेता यावी, यासाठी भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.

शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांनी कापूस खरेदी प्रक्रिया आणि शेतीविषयक विविध समस्या मांडल्या. तसेच काही बार्बीबाबत शंका उपस्थित करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी आणि खरेदी प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने संवाद साधण्यात आला.

आवश्यक उपाययोजनांची दिली माहिती

कापूस उत्पादनात वाढ करण्यासाठी केवळ लागवड करणे पुरेसे नसून पिकाचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर शिबिरात कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच सघन लागवड पद्धती अर्थात एचडीपीएस आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये! थकबाकीदारांच्या मालमत्ता सील, नळजोडण्यांवरही हातोडा

Web Title: Kapas kisan app cci cotton farmers training khamgaon pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • Benefit to farmers
  • Buldhana
  • Cotton Mill

संबंधित बातम्या

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
1

Buldhana: शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा, पीक माफीनंतरही खाती सुरू; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

PM Kisan Yojana 24th Installment : 30 ऑक्टोबरला ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार 2-2 हजार! त्वरित तुमचा स्टेटस चेक करा
2

PM Kisan Yojana 24th Installment : 30 ऑक्टोबरला ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार 2-2 हजार! त्वरित तुमचा स्टेटस चेक करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.